शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वणीत आगीचे तांडव, हॉटेल जळून खाक, सिलिंडरचाही स्फोट : लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:23 IST

कोणतीही जिवीत हानी झाली नाही : मोठी दुर्घटना टळली

संतोष कुंडकरवणी (यवतमाळ) : बुधवारी मध्यरात्रीनंतर वणीतील साईमंदिर चौकात आगीने अक्षरश: तांडव घातले. या चौकातील एका व्यावसायिक संकुलाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या एका हॉटेलला आतून आग लागली. या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. आगीदरम्यान हॉटेलमधील सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग इतकी भीषण होती की, या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

वणी-यवतमाळ मार्गावरील साईमंदिरासमोर एक मोठे व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावर एक खासगी बॅंक, तर वरच्या माळ्यावर न्यू रसोई नामक हाॅटेल आहे. वणीतील प्रशांत उदापूरकर व उमेश पिंपळकर हे या हॉटेलचे संचालक आहेत. या कॉम्प्लेक्सला लागूनच अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. लागूनच स्टेट बॅंकदेखील आहे. बुधवारी २६ मार्च रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे हॉटेल बंद झाले. हॉटेलमधील सर्व कर्मचारी आपापल्या घरी निघून गेले होते. मध्यरात्रीनंतर १.१५ वाजताच्या सुमारास हॉटलमधून अचानक धुराचे लाेट निघू लागले. रात्रीची वेळ असल्याने हा परिसर सामसूम होता. मात्र या मार्गावर मध्यरात्री पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना हॉटेलमधून धूर निघताना दिसला. त्यांनी लगेच याबाबत माहिती वणी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोवर हॉटेलमधून आगीचे मोठे लोळ बाहेर पडू लागले हाेते. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. या आगीत हॉटेलमधील चार फ्रिज, खुर्च्या, टेबल, तंदूर फॅन, ओव्हन, कुलर व सजावटीचे साहित्य जळून खाक झाले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंकाया भीषण आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र ७० लाखांचे नुकसान झाल्याचे या हॉटेलचे संचालक प्रशांत उदापूरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

मोठी दुर्घटना टळलीया इमारतीला लागून अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. ही आग अधिक पसरली असती, तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. आगीची माहिती मिळताच बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनात फायर फायटर दीपक वाघमारे, आशुतोष जगताप, प्रीतेश गौतम, शुभम टेकाम व वाहनचालक देविदास जाधव यांनी आग आटोक्यात आणली.

टॅग्स :wani-acवणीYavatmalयवतमाळfireआग