शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अखेर पायलच्या शिक्षणाचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:31 IST

तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला.

ठळक मुद्देमदतीचा ओघ : वसतिगृहात मिळाला प्रवेश, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, चंद्रपूर येथील दानशूरांची सहृदयता

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील शिवर-भंडारी येथील पायल ठवकर हिला वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग अवरूद्ध झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला अन त्यातून तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला.पायलसाठी आर्णीसह जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही संवेदनशील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. थेट मुंबई, कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील अनेकांनी हात पुढे केल्याने तब्बल ५१ हजार रूपये गोळा झाले. रविवारी येथे एका छोटेखानी कार्यक्रमात ही रक्कम पायल व तिच्या आईला सुपूर्द करण्यात आली. यात महागाव तालुक्यातील सवना येथील सहाय्यक प्राचार्य डॉ.केशव चेटूले यांच्या पुढाकारातून कुणबी समाज बांधवांच्या ‘वॉटसप’ समूहाकडून थेट पायलच्या बँक खात्यात २० हजार रूपये जमा करण्यात आले.आर्णीतील शिवजंयत्ती ऊत्सव समिती, जिजाऊ शिक्षण सहाय्यता समिती, तालुका प्राथमिक शिक्षक संघ (२३५), जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी, तहसीलदार संदीप भस्के, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रावते, तलाठी विरेंद्र चौधरी, नितीन गावंडे, आसाराम चव्हाण, राजू र्इंगोले, सुधीर कोषटवार, संदीप ढोले, सचिन ठाकरे, बाबाराव वानखडे, गजानन ठाकरे, दिनेश चौधरी, मधुकर ठाकरे, अ‍ॅड.प्रमोद चौधरी, अंबिका बुक डेपो, मामा ठाकरे, बबनराव मुंडवाईक, नितीन मेश्राम, विलास खाडे, आनंद पद्मावार, रवि चिद्दरवार, तुकाराम चव्हाण, राजकुमार महल्ले, अमोल जगताप, आशिष जगताप, तुळशिराम बोक्से, अमोल गावंडे, शरद लोंढे, खुशाल ठाकरे, सुभाष बरडे, प्रवीण काळे, अशोक चेटुले, भगवंतराव ईश्वरकर, पांडुरंग मुटकुरे, पी.आर. ठवकर, किशोर गायधनी, चंद्रशेखर पंचबुधे, सुधीर मते, रवींद्र मते, प्रकाश खाटीक, पियूष लुटे, अरुण निंबार्ते आदींनी मदत केली.पायलचे अश्रू झाले अनावरपायलने मदत स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केले. यावेळी तिचे अश्रू अनावर झाले होते. वडील नसताना आईने केलेला संघर्ष तिने कथन केला. यावेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते. तिच्या आईच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी यांनी पायलने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, स्वत:च्या पायावर उभे राहून समाजातील गरजूंना मदत करून रिटर्न गिफ्ट द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.