शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

अखेर मदन येरावार यांच्यासह १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:22 IST

येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअवधूतवाडी पोलीस ठाणे ११ कोटींच्या भूखंडाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ११ कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला.येथील आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली होती. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळले. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राजकिरण इंगळे यांनी या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश १४ मे रोजी जारी केले. मात्र त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी दोन दिवस टाईमपास करून गैरअर्जदारांना स्थगनादेशासाठी संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुषीने पत्रपरिषद घेऊन या भूखंड प्रकरणाचा भंडाफोड केल्याने व प्रसार माध्यमांनी बातम्या झळकविल्याने पोलिसांवर दबाव वाढला. स्पष्ट आदेश असताना अधिक टाळाटाळ करणे अंगलट येण्याची चिन्हे दिसताच अखेर गुरुवारी रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४२६, ४६५, ४६८, ४७१, ३४ व १२० (ब) कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे यात प्रमुख आरोपी आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. याशिवाय जयश्री ठाकरे, विजश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री उर्फ श्वेता देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखाणी, भूमिअभिलेख विभागाचे येथील तत्कालीन उपअधीक्षक, यवतमाळ नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक यात आरोपी बनविण्यात आले आहे. अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर यांनी हा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक जी.के. चौधर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात आता आरोपींची अटक केव्हा होते, याकडे नजरा लागल्या आहेत.पुरावा नष्ट केल्याचे कलम जोडणारअवधूतवाडी येथील कोल्हे चाळमध्ये आठ ब्लॉक होते. मात्र खरेदी-विक्री व्यवहारादरम्यान अचानक किरण देशमुख यांचा ब्लॉक गायब करण्यात आला. आठ ऐवजी सात ब्लॉक दाखविले गेले. एवढेच नव्हे तर हे ब्लॉक दिसू नये म्हणून ते बांधकाम पाडून तेथे सपाट जमीन करण्यात आली. या माध्यमातून पुरावा नष्ट करण्यात आला. याच मुद्यावरून आता या १७ जणांविरुद्ध भादंवि २०१ कलमान्वये पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा वाढविला जावा, अशी मागणी न्यायालयात केली जाणार आहे.चौकशी नव्हे थेट गुन्ह्याचे आदेशफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये प्रकरण न्यायालयात आल्यास सहसा न्यायालय पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देते. परंतु ११ कोटी रुपये किंमतीच्या ९२४१ चौरस फूट जागेच्या या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात पालकमंत्र्यांचे नाव नमूद असल्याने न्यायालयाने संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्यात याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार तथ्य आढळून आल्याने थेट गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले. पोलिसांना आता यात केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव तेवढी करावी लागणार आहे. या प्रकरणाची अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे अवधूतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार आयरे यांनी यापूर्वीच गोळा केली आहेत. एपीआय चौधर यांच्याकडे आता आरोपींची तत्काळ अटक, बयाने नोंदविणे, चार्जशिट बनविणे एवढेच काम शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावार