शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:35 IST

50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक

यवतमाळ : खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतक-यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 31 ‍डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्याची सन 2020-21 ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे असल्याचे जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे. 

यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13 लक्ष 9 हजार 592 हेक्टर आर. आहे. 16 तालुके असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 110 महसुली मंडळ, 682 समाविष्ट साझे आणि जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 2159 आहे. यापैकी 2046 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 46 पैसे जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील उर्वरीत 113 गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही. तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या 2046 असून यात यवतमाळ तालुक्यातील 135 गावे, कळंब तालुक्यातील 141 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 133, आर्णि तालुक्यातील 106, दारव्हा तालुक्यातील 146, दिग्रस तालुक्यातील 81, नेर तालुक्यातील 121, पुसद तालुक्यातील 185, उमरखेड तालुक्यातील 136, महागाव तालुक्यातील 113, केळापूर तालुक्यातील 130, घाटंजी तालुक्यातील 107, राळेगाव तालुक्यातील 132, वणी तालुक्यातील 155, मारेगाव तालुक्यातील 108 आणि झरीजामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 46 पैसे असली तरी यात यवतमाळ, नेर, केळापूर, घाटंजी, वणी आणि मारेगाव या तालुक्यांची पैसेवारी 46 पैसे, कळंब, बाभुळगाव, आर्णि, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि राळेगाव या तालुक्यांची पैसेवारी 47 पैसे तर झरीजामणी या तालुक्याची पैसेवारी 48 काढण्यात आली आहे. पैसेवारी न काढण्यात आलेल्या गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 17 गावे, कळंब तालुक्यातील 2 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 7, आर्णि तालुक्यातील 5, दारव्हा आणि नेर तालुक्यातील 0, दिग्रस तालुक्यातील 1, पुसद तालुक्यातील 4, उमरखेड तालुक्यातील 22, महागाव तालुक्यातील 3, केळापूर तालुक्यातील 11, घाटंजी तालुक्यातील 15, राळेगाव तालुक्यातील 1, वणी आणि मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 7 आणि झरीजामणी तालुक्यातील 11 गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिका-यांच्या अहवालात नमुद आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी