वॉटर कपसाठी ‘भर दो झोली’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:29 PM2018-05-18T22:29:16+5:302018-05-18T22:29:16+5:30

सत्यमेव जयते वॉटर कपसाठी शिवनेरी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे घाटंजीत ‘भर दो झोली’ अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील मांडवा गावकºयांनी पाण्यासाठी संघाटितपणे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांची तळमळ, त्यांची मेहनत थक्क करणारी आहे.

'Fill two cross' campaign for water cup | वॉटर कपसाठी ‘भर दो झोली’ अभियान

वॉटर कपसाठी ‘भर दो झोली’ अभियान

Next
ठळक मुद्देदानातून डिझेल खर्च : मांडवा गावकऱ्यांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : सत्यमेव जयते वॉटर कपसाठी शिवनेरी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे घाटंजीत ‘भर दो झोली’ अभियान राबविण्यात आले.
तालुक्यातील मांडवा गावकºयांनी पाण्यासाठी संघाटितपणे प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांची तळमळ, त्यांची मेहनत थक्क करणारी आहे. हार्ड पॅच असलेल्या काही ठिकाणी तर गावकºयांनी घामाने चर खोदून काढले. परंतु, जंगलातील काही भाग मानवी ताकदी बाहेरचा आहे. त्यासाठी मशीन हाच पर्याय होता. त्यामुळे गावकºयांनी वर्गणी गोळा केली. मात्र ती तुटपुंजी ठरल्याने हलाखीच्या परिस्थितीपुढे गावकºयांनी हात टेकले. तोंडाशी आलेला घास केवळ टार्गेट पूर्ण न करू शकल्याने हिरावला जाणार असल्याने गावकरी खचले. मशीन उपलब्ध असली, तरी डिझेलसाठी लागणारे पैसे गोळा करणे गावकºयांना शक्य नव्हते.
केवळ पाण्यासाठी अपार मेहनतीची तयारी दाखविणारे आणि कपारीतूनही पाणी काढायला तयार असणाºया या गावकºयांच्या डोळ्यात पैशाअभावी टचकन पाणी आले. ही स्थिती बघून शिवनेरी मल्टीपर्पज संस्थेचे सचिव अभय ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रुचिता ठाकरे, विशाखा त्रिवेदी यांनी ‘भर दो झोली’ अभियानाची संकल्पना मांडून घाटंजीत हे अभियान राबविले. यातून पाच हजारांची देणगी गोळा केली. ही देणगी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अंकित जयस्वाल, अंकुश ठाकरे, प्रशांत उगले, मांडवाचे सरपंच, उपसरपंच, अखिल भारतीय माना विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावकºयांच्या सुपूर्द करण्यात आली.

Web Title: 'Fill two cross' campaign for water cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.