शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोनाचा उद्रेक कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:00 AM

बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष तर ९४ महिला आहेत. यात यवतमाळातील १००, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी तीन, बाभूळगाव, उमरखेड येथे प्रत्येकी दोन, आर्णी, राळेगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी एक हजार २७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये २१५ जण पॉझिटिव्ह निघाले तर एक हजार ५६ निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २९६ इतकी झाली आहे.

ठळक मुद्दे२१५ नव्या रुग्णांची भर : एकाचा मृत्यू, ५६ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. सलग पाचव्या दिवशीही दोनशेच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालात २१५ नवे रुग्ण आढळून आले. तर यवतमाळ शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष तर ९४ महिला आहेत. यात यवतमाळातील १००, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी तीन, बाभूळगाव, उमरखेड येथे प्रत्येकी दोन, आर्णी, राळेगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी एक हजार २७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये २१५ जण पॉझिटिव्ह निघाले तर एक हजार ५६ निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २९६ इतकी झाली आहे. आतापर्यंत १६ हजार ७१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ९६९ इतकी आहे. कोरोनाने ४५१ जणांचा जिल्ह्यात बळी घेतला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०१ नमुने तपासणीला पाठविले आहेत. यापैकी एक लाख ३८ हजार ८८३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एक हजार १२२ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.  प्रत्येक तालुक्यामध्ये कोरोना तपासणी करण्यावर अधिक भर दिला जात आहे. एका केंद्रावर दिवसाला ५०० जणांचे नमुने घेण्याची सक्ती केली आहे. कोरोना लसीकरणात पोलीस कर्मचाऱ्यांची आघाडी  जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी स्वत: बुधवारी कोरोनाची लस घेतली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलीस, नगरपालिका यंत्रणा, पंचायतराज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत ५७ टक्के लसीकरण झाले असून यामध्ये पाेलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी आघाडीवर आहेत. नोंदणी असलेल्या इतरांनीही लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.आर्णी तालुक्यातील जवळा प्रतिबंधित क्षेत्र आर्णी तालुक्यातील जवळा येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने त्या गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गावाच्या सीमा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत. गावात जाण्यासाठी तेथे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच मुभा राहील. तर अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना पासेसशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. या पासेस संबंधित पोलीस ठाण्यातून देण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण अधिनियम यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस