शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या किमतीत होणार वाढ, शेतकऱ्यांवर आर्थिक भार, लिंकिंग थांबविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:17 IST

आर्थिक कोंडीने शेतकरी हैराण : शेती करायची तरी कशी ?

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना, खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली. शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री थांबवली होती; मात्र, उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. उदाहरणार्थ, डीएपी (डाय- अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रति पिशवी १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपयांवर गेली आहे. टीएसपी ४६ टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत एक हजार ३०० रुपयांवरून एक हजार ३५० रुपयांवर वाढली आहे. १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १ हजार ४७० रुपयांवरून १ हजार ७२५ रुपयांवर वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, शेतकरी वर्गातून खतांच्या किमती वाढवण्याऐवजी कमी करण्याची मागणी होत आहे.

त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारभाव मिळावा, तसेच शेतीसाठी आवश्यक इनपुट्सच्या किमती नियंत्रणात ठेवाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असताना, दुसरीकडे नवीन वर्षात खताचे भाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही शेती करायची, तरी कशी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

"रासायनिक खत कंपन्याचे दर अगोदरच जास्त आहेत. दर वाढवल्यामुळे शेतकरी चारऐवजी दोनच बॅग घेईल. शेतमालाला भाव नसल्याने सध्या बाजारपेठ थंडावली आहे. १०: २६: २६ ची उपलब्धता नाही. रासायनिक खताबरोबरची लिंकिंग थांबली पाहिजे." - सागर धवणे, उपाध्यक्ष, कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन.

"शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खताचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दड बसणार आहे." - दिलीप अलोणे, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी

"रासायनिक खताच्या अधिकच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून सेंद्रिय खत व बायोखत यावर भर द्यावा. रासायनिक खताबरोबर लिंकिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचा भुर्दंड बसत आहे." - नितेश ठाकरे, कृषी विक्रेता, वणी

टॅग्स :FertilizerखतेYavatmalयवतमाळfarmingशेती