शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

केमिकल कंपनीत शेड कोसळून महिला कामगार ठार, सातजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:44 IST

Yavatmal : एक महिला कामगार जागीच मरण पावली तर इतर सात कामगार जखमी

संतोष कुंडकरवणी (यवतमाळ) : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान, झरी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील डीलाईट केमिकल कंपनीतील टिनाचे शेड कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात एक महिला कामगार जागीच मरण पावली तर इतर सात कामगार जखमी झाले.

घटनेनंतर रात्रीच सर्व जखमींना तातडीने वणी येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्वजण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून नंतर त्यांना सुटी देण्यात आली. गंगा सुग्रीवलाल (२१) असे मृत महिला कामगाराचे नाव असून ही महिला छत्तीसगड राज्यातील पेरिटोला गावातील रहिवासी आहे.

गुरूवारी दुपारी तिच्या मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह तिच्या मूळ गावी रवाना करण्यात आला. बुधवारी रात्री वणी, झरी उपविभागात संततधार पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वारा वाहत होता. अशातच गणेशपूर खडकी येथील डिलाईट केमिकल कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांच्या अंगावर टिनाचे शेड कोसळले. हे सर्व कामगार रात्रपाळीत काम करीत होते. या दुर्घटनेत गंगा सुग्रीवलाल ही महिला गंभीररित्या जखमी होऊन जागीच मरण पावली, तर सचिन दिलीप चांदेकर (२७) रा. कृष्णानपूर, पुष्पा नामदेव उईके (४०) नामदेव कुज्जा उईके (४५), लताबाई तलांडे सर्व रा.रा.येरगव्हाण (ता.कोरपना, जिल्हा चंद्रपूर), डोमा ग्यानबा भरणे (४५), रा.सगनापूर ता.मारेगाव, मिनाबाई आत्राम (४२), निराशा कंवर (४२) रा.छत्तीसगड हे या दुर्घटनेत जखमी झाले.

बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस सुरू असताना कंपनीतील ५० फूट उंच असलेले टिनाचे शेड अचानक कोसळले. यावेळी या शेडमध्ये रात्रपाळीत काम करणारे १५ कामगार काम करीत होते. या घटनेचा तपास मुकूटबन पोलिस करीत आहेत.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरगणेशपूर शिवारातील डिलाईट केमिकल कंपनीत चुनखडीपासून व्हाईट वॉश लाइम पावडर तयार करून पॅकिंग करण्याचे काम केले जाते. या कंपनीत वणी झरी परिसरातीलच नव्हे तर छत्तीसगढ राज्यातील कामगारदेखील कामाला आहेत. मात्र या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनी कायद्यानुसार कंपनीने कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हा स्वतंत्र चौकशीचा भाग ठरणार आहे. पोलिस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ