शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
2
वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी
3
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....
4
बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली
5
धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
6
टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरचा मैत्रिणीने केला विश्वासघात! २५ लाखांची फसवणूक, दागिनेही गायब
7
अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...
8
Test Retirement: विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ
9
कोणत्या मिसाईलची टेस्टिंग? अंदमान समुद्राचे आकाश विमानांसाठी बंद; एका दिवसासाठी NOTAM जारी
10
ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक
11
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
12
पगारवाढ मिळत नाहीये? नोकरी सोडण्याआधी 'हे' ४ उपाय करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल!
13
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
14
"भारत आत येऊन ठोकून गेला आणि तुम्ही...", भर संसदेत पाकिस्तानी नेत्याने स्वतःच्याच सरकारची पोलखोल केली!
15
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
16
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
17
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
18
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
19
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
20
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

‘मिशन उभारी’ तून शेतकरी कुटुंबांना मिळणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार योजनांचा लाभ मिळाल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल. दोन पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडेल. शेतकऱ्यांचे पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही यासाठीच प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुकास्तरीय समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समूपदेशन केले जाणार आहे.

ठळक मुद्देअभिनव संकल्पना : जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अभिनव संकल्पनेतून  ‘मिशन उभारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून नैराश्यग्रस्त शेतकरी  कुटुंबांना बळ दिले जाणार आहे. पूर्णत: शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबात आत्महत्येच्या घटना घडत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा अभ्यास केला असता त्यांना ही बाब दिसून आली. त्यामुळेच ‘मिशन उभारी’ राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चीत केले आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देऊन त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार योजनांचा लाभ मिळाल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल. दोन पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडेल. शेतकऱ्यांचे पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही यासाठीच प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुकास्तरीय समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समूपदेशन केले जाणार आहे. अन्न सुरक्षा योजना, आरोग्य विषयक अडचणी सोडविण्यासाठी शिबीर, संरक्षित जलसिंचन, वीज जोडणी व सौर कृषीपंप योजना, सामूहिक विवाह सोहळे, प्रत्येक गावासाठी अधिकारी व कर्मचारी दत्तक योजना, पशुसंवर्धन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मागेल त्याला कर्ज, लोकसहभागातून विकास, ग्रामस्तरीय बळीराजा समितीच्यावतीने सरपंच व तलाठी यांच्या माध्यमातून महिन्याच्या १ व १५ तारखेला तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांना योजनांचा लाभ आदी उपक्रम मिशन उभारीअंतर्गत राबविले जाणार आहे. 

गावाेगावी बळीराजा समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती तयार करण्यात आली आहे. याशिवाय गावागावांत बळीराजा समिती गठीत केली जाणार आहे.  तलाठी, तहसीलदार यांना या समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे. समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाचे समूपदेशन केले जाणार आहे.बळीराजा समितीचे अध्यक्ष सरपंच तर सदस्य सचिव म्हणून पोलीस पाटील काम पाहणार आहे. इतर सदस्यांमध्ये विविध घटकांचा समावेश राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी