शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘केवायसी’ केली तरच मिळणार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. यानंतरही अनेकांनी आपले खाते अपडेट केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ९७ शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. असे असतानाही अनेक खात्यांमध्ये पैसे वळते होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. या तक्रारी निकाली काढण्यासाठी ई-केवायसीचा पर्याय सुचविण्यात आला आहे. अशी केवायसी असेल तरच खात्यात पैसे जमा होईल.ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. यानंतरही अनेकांनी आपले खाते अपडेट केले नाही.

‘केवायसी’ न केल्याने पैसे परत- ‘केवायसी’ करण्याच्या सूचना प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहे. यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. यामुळे त्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री सन्मान धन योजनेचे पैसेच जमा झाले नाहीत.- अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ‘केवायसी’नंतरच पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये झालेला संभ्रम दूर होईल आणि प्रत्येकाच्या खात्यात सन्मान धन योजनेचे पैसे जमा होतील.

३ हप्ते बँकेत जमा

- प्रधानमंत्री सन्मान धन योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आलीच नसल्याचे पुढे आले आहे.- काही शेतकऱ्यांच्या खात्यात नावांमध्ये दुरुस्ती आहे, तर काही शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिलेला नाही.

कसे कराल ‘केवायसी’

शेतकरी सन्मान धन योजनेसाठी जे खाते पुस्तक देण्यात आले आहे. त्या बँकेच्या खाते पुस्तकाला आधार कार्ड जोडायचे आहे. यासाठी शेतकऱ्याने बँकेत जायचे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना खात्याची ई-केवायसी करायची आहे असे सांगायचे.

३१ मार्चची डेडलाईन

ज्या खात्याचे पैसे अजूनही जमा झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल तर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा ही रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना