शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कृषी विद्यापीठाच्या महाग सापळ्यात शेतकरी ‘ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

ठळक मुद्देबाजारात पाच हजार कृषीचे दर आठ हजार रुपये : सोलर लाईट ट्रॅप खपविण्यासाठी कृषी विभागावर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीच्या त्रासाने शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विद्यापीठाने मात्र या संकटाला संधी मानून नफेखोरीचा मार्ग अवलंबलेला आहे. बोंडअळी व इतर कीटकांपासून बचावासाठी शेतकऱ्यांना बाजारात ५ हजार रुपयांचे कामगंध सापळे (ट्रॅप) उपलब्ध आहेत. मात्र कृषी विद्यापीठाने स्वत:चे संशोधन असल्याचा आव आणत चक्क आठ हजारांपेक्षा जास्त किमतीचे सापळे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांवर दबाव वाढविला जात आहे.विदर्भात मागील दोन-तीन वर्षात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे कपाशी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सदर ट्रॅप बनविण्यासाठी विद्यापीठाने केव्हापासून संशोधनाचे काम सुरू केले, याची कुठलीही माहिती विद्यापीठाने दिलेली नाही. सदर उपकरणाची चाचणी घ्यावी लागते. यात किती किडे, मित्र किडे पकडल्या गेले याबाबतही चाचणी घेतली जाते. परंतु हे सापळे विद्यापीठाने इतक्या तत्परतेने बाजारात आणण्याची घाई केली आहे, की त्याची चाचणी झाली किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, पाच वॅटचा यूवी बल दोन एकर परिसरातील किडीला आकर्षित करू शकतो, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही लोकप्रतिनिधीसमोर या सापळाची चाचणी करण्यात आली नाही. विद्यापीठाने हे सापळे तयार केले. ते बाजारात आणण्यापूर्वी वितरक नेमणे, शेतकऱ्यांशी संपर्क करणे आदी बाबी करावयास हव्या होत्या. त्या सर्व प्रक्रियेला धाब्यावर बसवून सदर ट्रॅप थेट बाजारात दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागावर दबाव टाकून हे सापळे शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने ८ हजार ८०० रुपये एवढी किंमत या सापळ्यांसाठी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.शेतकऱ्यांची तक्रार दुर्लक्षितशेतकºयांपर्यंत नवे संशोधन पोहोचविणे हा कृषी विद्यापीठाचा हेतू असतो. त्यात विद्यापीठ बºयाचदा कमी पडते. आता सोलर लाईट ट्रॅप हे संशोधन विद्यापीठाने आणल्याचा दावा केला जात आहे. बाजारात २ ते ५ हजारात ट्रॅप उपलब्ध असताना शेतकऱ्यांनी ८ हजार ८०० रुपयांचा विद्यापीठाचा ट्रॅप विकत घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रारही केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांवर हे सापळे थोपविले जाणार आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या सोलर लाईट ट्रॅपची किंमत कमी असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती