शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार’, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:53 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निराशेने घेरलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मंगळवारी सकाळी आत्महत्या केली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील घटनाआधी गळफास घेतला नंतर किटकनाशक प्राशन केले

यवतमाळ/घाटंजी : बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. ‘माझ्या आत्महत्येची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर राहील,’ अशी चिठ्ठी लिहून या शेतकºयाने प्राण त्यागला. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी ही घटना घडली. शंकर चायरे (५०) असे त्यांचे नाव आहे.चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, यंदा कापसाची पेरणी केली होती. तीन-चार वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने कर्ज वाढले होते. त्यातच कापसावर बोंडअळीने प्रचंड हल्ला चढविला. त्यामुळे ३० टक्केही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांची मुलगी जयश्रीने सांगितले.मंगळवारी सकाळी ते गावालगतच्या आपल्या शेतात गेले. सुरुवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटला, नंतर त्यांनी कीटकनाशक घेतले. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मी कर्जबाजारी झालो, बोंडअळीने पीक वाया गेले,’ असेही म्हटले आहे. शंकर चायरे यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी अलका यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.>पीएम, सीएम आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाहीगावक-यांनी चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे आणला. शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि चमूने शवविच्छेदन गृहापुढे ठिय्या दिला. चायरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत द्यावी, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना भेट द्यावी, अशी मागणी केली. या मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी घेतली. सरकारचे धोरण फसल्यानेच पंतप्रधान मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकºयाने आत्महत्या केली. यातून बोध घेऊन सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी.- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते-विधानसभा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या