लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पणन महासंघाने ८९ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. खरेदी झालेल्या कापसाचे मूल्य ४८ कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील २४ कोटींचे चुकारे करण्यात आले. २४ कोटींचे चुकारे थांबले आहेत. पुढील आठ दिवसात हे चुुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता पणनच्या संचालकाने वर्तविली आहे.खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे.शेतकरी पणन महासंघाकडे कापूस विकत आहे. मात्र चुकाºयाकरिता थोडा विलंब लागत आहे. आठ ते दहा दिवसात कापसाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. जिल्ह्यातील सात केंद्रांवर आतापर्यंत ८९ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यातील २४ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. सीसीआयने ७९ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस सव्वा लाख क्विंटलच्या घरात आहे. आता खरेदी बंद झाल्याने अडचणी वाढणार आहे.हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज लक्षात घेत पणन महासंघाने शासकीय कापूस खरेदी तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत ही कापूस खरेदी आता बंद असणार आहे.- सी.पी. गोस्वामीविभागीय व्यवस्थापक,कापूस पणन महासंघ
शेतकऱ्यांचे कापसाचे २४ कोटींचे चुकारे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:35 IST
खासगी बाजाराच्या तुलनेत हमी केंद्रातील कापसाचे दर क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शेतकºयांची पहिली पसंती हमी केंद्राला आहे. यातून पणन महासंघाकडे कापूस विक्रीकरिता रांगा लागल्या आहेत. हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगही अपुरे पडत आहे.
शेतकऱ्यांचे कापसाचे २४ कोटींचे चुकारे अडले
ठळक मुद्देखरेदी थांबली : पणन महासंघाची सावध भूमिका