शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:18 IST

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता आणि चांगला भाव मिळावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी शेतकरीपुत्राने स्थापन केलेल्या कंपनीने तीन हजारांवर शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. या कामाची अमेरिकन मासिक ‘फोर्ब्स’ने दखल घेतल्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात या कंपनीने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करून मोठा आधार दिला होता.

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी २०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ग्रामहित’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाच्या काढणीनंतर शेतमाल, बाजारपेठेतील चढउतार, शेतमालाला सुरक्षितता मिळवून देणे आदींबाबत मोबाईलद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील वरूड, सावळीसदोबा आणि कळंब, तर अकोला जिल्ह्यातील मंगरूळ कांबेसह इतर दोन गावांत सहा गोडाऊन उभारली असून शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीतर्फे अल्प व्याजदरावर कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो. 

उच्चशिक्षित दाम्पत्य- शेतकरीपुत्र असलेल्या पंकज महल्ले यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून समाजकार्याची पदव्युतर पदवी प्राप्त केली. काही वर्षे टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात काम केले. - श्वेता महल्ले यांनी अभियांत्रिकी पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी मिळविली. या दोघांनीही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘ग्रामहित’ सुरू केले. आज ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळbusinessव्यवसायForbesफोर्ब्स