शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

शेतकऱ्याची रानडुकराशी झुंज

By admin | Updated: November 21, 2015 02:45 IST

फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी नाल्यावर गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला.

पिंपळखुटीची घटना : दैव बलवत्तर म्हणून वाचला, १५ मिनिटे झटापटराळेगाव : फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी नाल्यावर गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला. मात्र शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने हा हल्ला परतवून लावला. तब्बल १५ मिनिटे रानडुकरासोबत झुंज दिली. दैवबलवत्तर म्हणून शेतकरी बचावला. मात्र त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्याच्यावर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. रामकृष्ण आनंदराव झळके (५०) असे रानडुकराशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेतात कामासाठी गेले. फवारणीचे काम सुरू होते. फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी लगतच्या नाल्यावर गेले. त्यावेळी झुडूपात लपून असलेल्या एका रानडुकराने सरळ रामकृष्णवर चाल केली. रामकृष्णला हा प्रकार लक्षात येताच त्याने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र झाडाची फांदी तुटल्याने ते नाल्याच्या पाण्यात कोसळले. त्यावेळी रानडुकराने आपले तीक्ष्ण दात त्यांच्या तोंडावर रोवले. त्याच वेळी जीव मुठीत घेऊन रामकृष्णने रानडुकराचा जबडा पकडला. ही झटापट सुरू असताना रामकृष्ण पाण्यात बुडले. मात्र काही वेळातच ते बाहेर आले. त्यावेळी त्यांनी नाल्यातून मोठी दगड सोबत आणले होते. या दगडांचा त्यांनी रानडुकरावर मारा केला. त्यामुळे रानडुक्कर थोडे बाजूला सरले. नाल्याबाहेर येऊन त्यांनी पुन्हा या रानडुकरावर दगडांचा मारा केला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर रानडुक्कर जंगलात पळून गेले. दरम्यान या घटनेची माहिती होताच अनेकांनी नाल्याच्या तीरावर धाव घेतली. रामकृष्णाला जखमी अवस्थेत राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. या घटनेने रामकृष्ण भयभीत झाला असून दैवबलवत्तर आणि वेळेवर सूचलेल्या युक्तीनेच आपले प्राण वाचले असे तो सांगत आहे. (प्रतिनिधी)