शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागवणा-या अधिका-यांचे शेतक-यांनीच केले स्टिंग आॅपरेशन, ‘पॉवर ग्रिड’ची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:43 IST

शेतात टॉवर उभारताना पिकांचे नुकसान करणा-या पॉवर ग्रिड कंपनीविरुद्ध शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र, या कंपनीचे अधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना आपला तोरा दाखवून सोयीच्या आॅर्डर काढून घेत आहे.

यवतमाळ : शेतात टॉवर उभारताना पिकांचे नुकसान करणा-या पॉवर ग्रिड कंपनीविरुद्ध शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र, या कंपनीचे अधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना आपला तोरा दाखवून सोयीच्या आॅर्डर काढून घेत आहे. मंगळवारी असाच प्रकार सुरू असताना तेथे पीडित शेतकरी धडकले आणि या गैरप्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आले. घाटंजी आणि पांढरकवडा तालुक्यात पॉवर ग्रिड कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. परंतु, यात शेतक-यांना विविध प्रकारे फसविले जात असल्याची बाब या शेतक-यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी ‘लोकमत’ला सांगितली. टॉवरच्या कामाबाबत काही शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी जिल्हाधिका-यांनी सुनावणी ठेवली होती. ही सुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यापुढे झाली. परंतु, आरडीसींनी शेतक-यांची बाजू समजून न घेता थातूरमातूर सुनावणी केल्याचा आरोप अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी केला. त्यानंतर पॉवर ग्रिडच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांसोबत बसून स्वत:च्या मर्जीनुसार आॅर्डर तयार करणे सुरू केले होते. ही बाब शेतक-यांच्या लक्षात येताच, ते सर्व अ‍ॅड. चवरडोल यांच्यासह तेथे पोहोचले. कर्मचा-यांना सूचना देऊन पॉवर ग्रिडचे अधिकारी आपल्या पद्धतीने आॅर्डर तयार करीत असल्याच्या प्रकाराचे त्यांनी चित्रीकरण केले. त्यानंतर हे चित्रीकरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दाखविण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी मंगळवारची सुनावणीच स्थगित करून ५ डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी ठेवली आहे. 

टॉवरसाठी शेतपिकांचे नुकसानया कंपनीने टॉवरसाठी ५४ बाय ६० मीटर एवढी जागा घेऊ असे कागदोपत्री दाखविले. प्रत्यक्षात तेवढ्या जागेत टॉवर होतच नाही. त्यामुळे २०० बाय २०० फूट जागा वापरली जात आहे. यात शेतक-यांची एक ते दीड एकर जमीन जात आहे. शिवाय गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये म्हणजे पीक ऐन भरात असताना काम सुरू केले. आताही नोव्हेंबरमध्ये काम केले जात आहे. या दोन्ही वेळेस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. परंतु, त्या तुलनेत शेतक-यांना मोबदला देण्यात येत नाही. साधी ४०० केव्हीची लाईन टाकतानाही ८ लाखांपर्यंत मोबदला दिला जातो. येथे ७६५ केव्हीची लाईन टाकली जात असतानाही केवळ ६० ते ६२ हजार रुपयेच शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, असे अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवाय, सुनावणीतील पक्षकार स्वत:च मर्जीप्रमाणे आॅर्डर तयार करणार असतील तर शेतकºयांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Farmerशेतकरी