शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला उताराच नाही : बिना दाण्याच्या शेंगा, एकरी दोन क्विंटलचेही पीक नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उशिरा सुरू झालेला पावसाळा, नंतर झडीस्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेती उत्पादन घटण्याची चिन्हे आहे. हाती आलेल्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल, अशी चिन्हे दिसत नाही. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांचे हे सर्व प्रश्न बाजुला फेकले गेले आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शेतमाल खरेदीसाठीची कुठलीही तयारी नाही. यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रकाशपर्व साजरे करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. या पिकावर रब्बीचे नियोजन केले जाते. उधारीवर घेतलेले हातउसने देण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीनचा उताराच आला नाही. लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याचाच धोका आहे.पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे. मजुरांअभावी अनेकांना सोयाबीन सोंगता आले नाही. तर अनेक शेतकºयांना परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. काही मोजक्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली आहे. या ठिकाणी अ‍ॅव्हरेज घटला आहे. प्रारंभीचाच अ‍ॅव्हरेज घटल्याने मागाहून झालेल्या पेरणी क्षेत्रात उत्पन्नच येणार किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना ८ ते १० क्विंटलचा सरासरी अ‍ॅव्हरेज आला. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दोन ते सात क्विंटलपर्यंतच अ‍ॅव्हरेज आला आहे. हा अ‍ॅव्हरेज एकरात चार ते पाच क्विंटलने घटला आहे. यानंतरही शेतमालास भाव नाही, अशी संपूर्ण परिस्थिती आहे.उत्पादन घटण्याची प्रमुख कारणेजिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार ३४७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. अल्पावधीत हाती येणारे पीक अतिपावसाने क्षमतेपेक्षा अधिक वाढले. यासोबतच गवताचे प्रमाण वाढले. तणनाशकानंतरही हे गवत मेले नाही. यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा परिपक्व झाल्या नाही. मिरचीचे बी असावे असे सोयाबीनचे दाणे आहेत. तिळ आणि ज्वारीइतके बारीक दाणे तयार झाले आहे. पिकांना हवा असलेला सूर्यप्रकाश मिळाला नाही. किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. उंटअळी, खोडकिडी, पांढरी माशी या प्रकारामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले. काळीच्या जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक पाणी आले. यातून मुळाची वाढ झाली नाही. त्याला पांढऱ्या गाठी पकडल्या नाही. पिकाला ताण बसला नाही. यामुळे शेंगा कसल्या नाही. यातून सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. भरकाच्या जमिनीत काळीच्या जमिनीपेक्षा अधिक उतारा आला आहे.शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाखर्चालाही परवडेनायावर्षीचे पीक अतिपावसाने वाया गेले. कापणीनंतर हातात आलेल्या उत्पन्नानंतरच याचे वास्तव उलगडले. अर्धीअधिक शेती चिबडली. येणारे प्रत्येक वर्ष शेतीसाठी अवघड होत चालले आहे. शेती खर्चालाही परवडेनाशी झाली आहे.- शशांक बेंद्रे 

शेती सोडून रोजमजुरीच करूघरातले तीन कमावते माणसं शेतात राबराब राबत आहे. त्यांनी शेती सोडून इतर ठिकाणी रोजमजुरी केली तरी प्रत्येकला सहा हजार रूपये महिना पडतो. तिघांना महिन्याकाठी २० हजारनुसार वर्षाला अडीच लाख होतात. मात्र ही मेहनत शेतात केली तर हातात पाच पैसे राहण्याची शाश्वती नाही. उलट कर्ज होत आहे. यामुळे पुढील काळात शेती सोडून रोजमजुरीच करू.- प्रवीण ठाकरे

दिवाळी अंधारात जाणारसोयाबीनची काढणी केल्यावर येणाºया पैशातून जुनी परतफेड आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन होते. आता एकरी उत्पन्नच घटले आहे. काही भाग तर सोंगावा का नाही असा विचार पडला आहे. अशा स्थितीत दिवाळी तोंडावर आली आहे. ही दिवाळी अंधारात जाईल, अशी आमची अवस्था आहे.- मनिष जाधव 

उत्पादन घटले, भाव पडलेजे सोयाबीन काढणीला आले. त्याची काढणी करण्यात आली. तर एकूण उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न्यायचे ठरविले तर बाजारात सोयाबीनचे दर पडले आहे. आधी ३८०० रूपये क्विंटल असलेले सोयाबीन ३५०० पर्यंत खाली घसरले आहे. यामुळे शेतकºयांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.- अनिल लांडगे सोयाबीन शेंगा भरल्याच नाहीयावर्षी सोयाबीनची अवस्था भयंकर खराब आहे. एकरी उत्पादन न विचारलेलेच बरे. वरच्या शेंगा भरल्या, मधातल्या शेंगा बारकावल्या आणि खालच्या शेंगामध्ये दाणेच भरले नाही. अशी संपूर्ण अवस्था आहे. यातून उत्पन्न घटले आहे.- अजय डवले 

टॅग्स :Farmerशेतकरी