शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नेर पोलीस ठाण्यावर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

मुकुंद राठोड हे शेतात जागल करत होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ जण त्यांच्या शेतात शिरले. मुकुंद राठोड यांनी शेजारील शेतात असलेले अक्षय उरकुडे, देवानंद राठोड, टिकम चव्हाण यांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचवेळी चोरटे पळाले. शनिवारी शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून चोरट्यांवर कारवाई करावी आणि कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

ठळक मुद्देकापूस चोऱ्या थांबवा । मोझर, रत्नापूर, लवतवाडी परिसरात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यात कापूस चोरट्यांनी हैदोस घातला आहे. रात्रीच्यावेळी शेतातील कापूस चोरून नेला जात आहे. शुक्रवारी रात्री दहा शेतातील कापूस वेचून नेत असताना चोरटे शेतकऱ्यांना आढळले. पाठलाग केल्याने वेचलेला कापूस टाकून चोरटे पसार झाले. दरम्यान, या कापूस चोरांचा बंदोबस्त करावा, ही मागणी घेऊन शेतकरी शनिवारी येथील पोलीस ठाण्यावर धडकले.मोझर, रत्नापूर, लवतवाडी शिवारातील शेतात कापूस चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. काही शेतकºयांना हा प्रकार आढळून आला. अशोक मस्के, शोभा मस्के, रवींद्र राठोड, परमानंद राठोड, मुकिंदा राठोड, किशोर भेंडे, प्रभाकर शंभरकर, भीमराव उरकुडे, दिनेश बडगे, सचिन ठाकरे, अनिल काळे, गणेश कावरे आदी शेतातून कापूस चोरला होता. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्यांनी पाठलाग केल्याने जवळपास दोन क्विंटल कापूस टाकून चोरटे पळाले. मोझर येथील पवन तलमले यांच्या शेतातील स्प्रिंकलर संचही चोरी गेला.मुकुंद राठोड हे शेतात जागल करत होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ जण त्यांच्या शेतात शिरले. मुकुंद राठोड यांनी शेजारील शेतात असलेले अक्षय उरकुडे, देवानंद राठोड, टिकम चव्हाण यांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचवेळी चोरटे पळाले. शनिवारी शेतकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून चोरट्यांवर कारवाई करावी आणि कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.नगरसेवक संदीप गायकवाड, निखिल भेंडे, प्रशांत जाधव, राहुल इंगोले यांनी शेतकऱ्यांची बाजू पोलीस ठाण्यात मांडली. विविध कारणांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. अशातच चोरट्यांकडून त्रास होत आहे. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस