शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:33 IST

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.

ठळक मुद्देसुविधा की दुविधा ?: तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झाली. मात्र महा-ई-सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तालुक्यातील लोणी येथील शेतकरी भाऊराव बोडखे पाटील यांनी बसस्थानकासमोरील एका सेवा केंद्रात पाच शेताचा पीक विमा भरला. मात्र त्यातील काही शेतातील पिकाचे पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ त्यांना मिळाला नाही. महासेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट तर करीतच आहे, सोबत फसवणूकही करीत आहे. सेतू सुविधा केंद्र चालक शेतकऱ्यांना १००-१५० रुपयांची मागणी करीत आहे. एका शेतकऱ्याची एकापेक्षा जादा शेती असली, तरी त्याच्या प्रत्येक शेतासाठी वेगळे पैसे मागत आहे. याबाबत भाऊराव बोडखे यांनी तहसीलदारांना निवेदनातून लूट करणाऱ्या सेतू केंद्राचा परवाना रद्द करून कारवाईची मागणी केली. शहरातील अनेक ई-सेवा केंद्र चालक पीक विम्याचे दर, कमी-जास्त आकारत आहे. काही केंद्र चालक ७५० रुपये, तर ८४० रुपये घेत आहेत. पैसे घेतल्यानंतर पावतीही दिली जात नाही, असा आरोप शेतकरी भाऊराव बोडखे यांनी केला आहे.मनसेनेही तहसीलदारांना तक्रार दिली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर असभ्य वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. नेट प्रॉब्लेम दर्शवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक लूट सुरू असल्याने पीक विमा दरपत्रक सेतू केंद्रनिहाय तत्काळ लावावे, पीक विम्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेने केली. तहसीलदारांनी तत्काळ कारवाई न केल्यास मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा दिला. निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम, पुंडलिक शिंदे, गिरीश अनंतवार, संदीप लांडे, अश्विनी चिरडे, अजय नागगणे, रवी सूर्य, सतीश गवारे, वसंता मनवर, अक्षय इनामे आदींच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार