शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, संयोजक अनुप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकरी आपल्या बैलबंड्या घेऊन सहभागी झाले होते. अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनीसुद्धा या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शेतकरी नेत्यांनी केंद्र शासन कशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट करीत आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेत व राज्यसभेत कुठलीही चर्चा न करता शेतकरी विरोधी विधेयक केंद्र शासनाने मंजूर केले. ज्या प्रमाणे इंग्लंडच्या इस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांची लूट केली. त्याच पद्धतीचे लूट करणारे कायदे भाजप सरकारने तयार केले आहे. याला विरोध करण्यासाठी यवतमाळात बधुवारी शेतकरी वारकरी संघटनेने बैलबंडी मोर्चा काढला. शासनाच्या धोरणाचा निषेध करीत हा मोर्चा आझाद मैदानातून जिल्हा कचेरीवर धडकला.शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, संयोजक अनुप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकरी आपल्या बैलबंड्या घेऊन सहभागी झाले होते. अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनीसुद्धा या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शेतकरी नेत्यांनी केंद्र शासन कशा पद्धतीने शेतकऱ्याची लूट करीत आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.शेतकरी विरोधी बिलामुळे कार्पोरेट कंपन्यांना शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याची खुली सूट मिळणार आहे. सध्याची बाजार समिती मोडकळीस येणार आहे. साठेबाजीला मोकळे रान मिळणार आहे. यात शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांची लूट करण्याचा परवाना बहुराष्ट्रीय कंपन्यांना मिळणार आहे.शासनाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा कुठलाही विचार केलेला नाही. बाजारात हमी भावाने धान्य न खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नाही. आजच शेतकऱ्यांना खेडा खरेदीच्या माध्यमातून अक्षरश: लुटल्या जात आहे. त्यावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. नवीन विधेयकामुळे तर शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मोकळे रान मिळणार आहे. त्यामुळे हा कायदा तत्काळ रद्द करावा अशा मागणीचे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावेळी शेतकरी व मार्गदर्शक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्र सरकार कंपन्यांच्या हातचे बाहुलेसरकार शेतकरी व सामान्य नागरिकांचे हित धोक्यात घालून बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदेशीर ठरेल अशीच ध्येय धोरणे राबवित आहे. इंग्रजांप्रमाणेच शेतकऱ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांचा गुलाम बनविण्याचे षडयंत्र आखले जात आहे. त्यामुळेच केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या महत्वपूर्ण विधेयकावर दोन्हीही सभागृहात चर्चाच होऊ दिली नाही. लोकशाहीत कुठलेही विधेयक मंजूर करताना त्यावर विरोधकांना बाजू मांडण्याची संधी देणे क्रमप्राप्त आहे. मात्र शेतकऱ्यांशी निगडित असलेले हे तीन विधेयक बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता भाजप सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतले. यावरून भाजप सरकार बहुराष्ट्रीयकंपन्यांच्या हातचे बहुले बनल्याची टीका शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सोपविलेल्या निवेदनात केली.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी