शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेत रस्त्याचा वाद, कुऱ्हाडीने शेतकऱ्याला केले ठार

By सुरेंद्र राऊत | Updated: June 14, 2025 18:02 IST

Yavatmal : अकोला बाजार येथे शुक्रवारी आठवडी बाजारात दोघांमंध्ये रक्त बंबाळ होईपर्यंत मारहाणीची घटना

अकोला बाजार (यवतमाळ) : आकपुरी शिवारातील शेताच्या रस्त्यावर काट्या टाकल्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादात एकाने कुऱ्हाडीने दुसऱ्यावर हल्ला चढवला, कुऱ्हाडीचा वार जीव्हारी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी आकपुरी शिवारात घडली. सुधाकर महादेव बोटरे (४५) रा. धानोरा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

आकपुरी शिवारात शेत गट क्रमांक ४६ व ४७ दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर  रमेश शामराव कुळसंगे (४०) रा. गणेशपुर याने काट्या टाकून रस्ता बंद केला. याचा जाब विचारण्यासाठी  सुधाकर बोटरे रमेशकडे गेले, यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला.  रमेश कुळसंगे याने रागाच्या भरात हातातील कुऱ्हाडीच्या मागील बाजुने सुधाकरच्या छातीवर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  

या घटनेनंतर वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार विकास दांडे, पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे , नीलकमल भोसले करीत आहे. वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरा दिवसातील खुनाची ही दुसरी घटना आहे. यापुर्वी ३ जुन रोजी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत यावली (कारेगाव ) येथे पतीने पत्नीची तलवारीने हत्या केली होती. अकोला बाजार येथे शुक्रवारी आठवडी बाजारात दोघांमंध्ये रक्त बंबाळ होईपर्यंत मारहाणीची घटना घडली. गुन्ह्याच्या घटना मध्ये सतत वाढ होताना दिसुन येत आहे. वडगाव पोलीस ठाण्यात विकास दांडे हे नव्यानेच ठाणेदार म्हणून रुजू झाले आहे. वाढती गुन्हेगारी, आणि अवैध धंदयावर वचक निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ