शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शहीदाच्या कुटुंबाने जोपासली देशप्रेमाची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांच्या अडचणी वाढल्या. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली.

ठळक मुद्देगावकऱ्यांना मदत : केळझरा, कृष्णापूर येथे धान्य, किराणा किटचे वाटप, गरजवंतांना अडचणीत दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबातील कर्ता मुलगा शहीद झाला. तो शहीद झाल्यानंतरही त्याच्या कुटुंबाने देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. याच ज्योतीतून कोरोनाच्या संकटसमयी शहीदाच्या कुटुंबाने गावातील गरजवंतांना मदतीचा हात दिला.केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांच्या अडचणी वाढल्या. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही स्थिती लक्षात घेऊन आडे परिवाराने केळझरा आणि कृष्णनगर येथे शेतकरी, शेतमजूर, गरजवंतांना मदतीचा हात दिला.शहीद ज्ञानेश्वर आडे परिवाराचे प्रमुख तथा कृषी ऊत्पन बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, त्यांच्या पत्नी केळझराच्या सरपंच कुंतीबाई आडे यांनी गावातील गरजवंतांना आधार देण्यासाठी जे गरजेच आहे, ते देण्याचे ठरविले. यानंतर प्रति कुटुंब पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो साखर, चहापत्ती, मिठ पुडा, तूर डाळ, तेल, कांदे आदी मिळून प्रति कुटुंब एक कीट तयार केली. अशा किट गरजवंतांना देण्यात आल्या.यात कृष्णनगर येथील ३५२, तर केळझरा येथील ४५ कुटुंबांना मदत देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, नुनेश्वर आडे, कुंतीबाई आडे, बाजार समितीचे सचिव के.डी. वारकड, इंदल महाराज आदी उप्स्थित होते.गावकऱ्यांनी व्यक्त केला अभिमानअत्यंत अडचणीच्या काळात शहीदाच्या कुटुंबांने मदत दिल्याने गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला. मुलगा शहीद झाल्यानंतरही आडे कुटुंबाने या उपक्रमातून देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आपल्या गावात शहीद ज्ञानेश्वर आडे जन्माला आल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी अडचणीच्या काळात देशवासीयांच्या मदतीसाठी धाव घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस