शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगावात बोगस बियाण्यांचा केला पर्दाफाश; ४०० पाकिटे, चारचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:01 IST

पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल : १२ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाण्यांवर पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी धाड टाकली. ४०० बियाणे पाकिटांसह चारचाकी वाहन जप्त करून आरोपींवर पोलिस ठाण्यात गुन्हे दखल केले. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांचा पर्दाफाश झाला आहे. बाभूळगाव येथे एमएच २९ सीबी २६९० क्रमांकाच्या चारचाकीने प्रतिबंधित कापूस बियाण्याची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने चालक प्रवीण वासुदेव साखरकर (वय २९, रा. गवंडी) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने रमेश सुखदेव लांजेवार (वय ५७, रा. गवंडी), किशोर रामराव वाटमोडे (वय ४९, रा. गवंडी) या दोघांच्या मदतीने बियाणे विक्री केल्याचे सांगितले. 

पथकाने या दोघांच्या ताब्यातून पाच लाख १६ हजार ७५० रुपयांचे प्रतिबंधित बियाण्यांचे ४०० पाकिटे, सात लाखांची दोन चारचाकी वाहने असा एकूण १२ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी तिघांवर बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९, कापूस किंमत नियंत्रण कायदा २०१५ अंतर्गत गुन्हे दाखल केले. ही कारवाई ठाणेदार एल. डी. तावरे, एपीआय हेमंत चौधरी, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका ढेरे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, मंडळ कृषी अधिकारी सुरेश गावंडे, कृषी अधिकारी संजय पवार, विस्तार सी. एस. हेडाऊ, पोलिस कर्मचारी विजय लोखंडे, गणेश शिंदे, नीलेश भुसे, दिनेश अहिरे, भूषण बिरे यांनी केली.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळfarmingशेती