लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिसांचे सर्वाधिक योगदान मानले जाते. या योगदानासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने चक्क आपला साखरपुडाही लॉकडाऊन संपेपर्यंत पुढे ढकलला.माधुरी बावीस्कर असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. मूळ नंदूरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या माधुरी बावीस्कर यांचा विवाह अखिल भारतीय महसूल सेवेतील निखिल ढळ (पुणे) यांच्याशी निश्चित झाला. निखिल हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नियुक्त आहेत. ते पुण्याचेच आहे. त्यांचे सध्या नागपूरला प्रशिक्षण सुरू आहे. निखिल आणि माधुरी यांचा साखरपुडा १२ एप्रिलला यवतमाळात निश्चित करण्यात आला होता. परंतु कोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा परिसरात एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांची ड्युटी लागली. त्यांनाच तेथील इनचार्ज बनविण्यात आले. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ या कोरोनाग्रस्त भागात जातो आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमाही सील आहे. या सर्व अडचणी ओळखून माधुरी बावीस्कर आणि निखिल ढळ यांनी आपला साखरपुडा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक होत आहे.कोरोनाग्रस्त भागात शासनाचे अन्य अधिकारी जाण्यास धजावत नसताना पोलीस मात्र २४ तास त्याच भागात तैनात आहेत. तेथेच त्यांना चहा, नास्ता, जेवण उरकावे लागते. जीव धोक्यात घालून पोलीस खऱ्याअर्थाने कोविड योद्धा म्हणून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. आधी कोरोनाशील लढाई, ती जिंकल्यानंतरच साखरपुडा आणि विवाह असाच संदेश एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
कोरोनासाठी साखरपुडा लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST
कोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा परिसरात एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांची ड्युटी लागली. त्यांनाच तेथील इनचार्ज बनविण्यात आले. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ या कोरोनाग्रस्त भागात जातो आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमाही सील आहे. या सर्व अडचणी ओळखून माधुरी बावीस्कर आणि निखिल ढळ यांनी आपला साखरपुडा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
कोरोनासाठी साखरपुडा लांबविला
ठळक मुद्देकर्तव्याला दिले प्राधान्य : एसडीपीओ बावीस्कर यांचा प्रेरणादायी निर्णय