शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:54 IST

शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती.

ठळक मुद्दे पहिला टप्पा : ४० दिवस अविरत श्रमदान, पुसदमध्ये लोकचळवळ

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती.नाम फाऊंडेशन आणि पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या माध्यमातून २ मेपासून पूस नदी स्वच्छता अभियानाला प्रारंभ झाला होता. या कार्यासाठी नाम फाऊंडेशनने दोन पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्यासाठी दररोज लागणाऱ्या ३५ हजार रुपयांच्या डिझेल खर्चाची जबाबदारी पुसद शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, पतसंस्था, बँका आणि नागरिकांनी स्वीकारली. रोजच्या रोज लोकप्रतिनिधीतून निधीची जुळवाजुळव करीत पूस नदी पुनरुज्जीवन समितीने ४० दिवसात या अभियानाला गती दिली. पुसद-नागपूर रस्त्यावरील मोठ्या पुलापासून ते टिळक पुतळ्यापर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नियोजनबद्ध करण्यात आलेल्या या कामात पुसदकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.पावसाळा सुरू झाल्यामुळे व सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्याने पूस नदी भरुन वाहत आहे. पूस नदीला आलेला पूर पाहून श्रमदात्यांना मनातून आनंद झाला. हेच या कार्याचे यश होय. नाम फाऊंडेशनची यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कामे १ जूनलाच बंदी झाली असताना पूस नदी पुनरुज्जीवन समिती व पुसदकरांचा उत्साह पाहून दहा दिवस जास्त मशीन उपलब्ध करून दिली. हा नामचा सकारात्मक प्रतिसाद पुसदकरांसाठी महत्वाचा ठरला आहे. समारोपीय कार्यक्रमात पोकलॅन्ड मशीन चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामचे समन्वयक स्वप्नील देशमुख उपस्थित होते.पूस नदी पुनरुज्जीवन समितीचे अभिजित चिद्दरवार, डॉ. मोहंमद नदीम, अभय गडम, डॉ. राजेश पाचकोर, सतीश भुसाळे, अ‍ॅड. विवेक टेहरे, अजय क्षीरसागर, शशांक गावंडे, पवन बोजेवार, मोहन बोजेवार, मोहन चव्हाण, मारोती भस्मे, आनंददीप जांगीड, सचिन भिताडे, गोपाल सुरोशे, अमर आसेगावकर, प्रा.स्वाती वाठ, मधुकर चव्हाण, प्रा. विलास भवरे यांच्यासह पुसद शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :riverनदी