शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या मुद्रांकांचा सामान्यांना फटका; योजनांचा भार मध्यमवर्गीयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:47 IST

Yavatmal : शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी ५०० रुपयांचा मुद्रांक

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : महसूल वाढीसाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून थेट ५०० रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र व शपथपत्रासाठी ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर करावा लागणार आहे. यातून शासनाचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र १००, २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मात्र, शासकीय कामांसाठी मुद्रांक पेपरची माफी कायम ठेवली आहे.

महायुती सरकारने अनेक योजनांचा धडाका लावल्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी व महसूल वाढावा यासाठी मुद्रांक अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी नागरिकांना शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र भुर्दंड सहन करावा लागणार आहे. घर किंवा खोली भाड्याने देताना करावा लागणाऱ्या करारासाठीही ५०० रुपयांचाच मुद्रांक लावावा लागणार आहे.

तसेच यापूर्वी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होत होते. ते आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लावावे लागेल, तसेच विविध शासकीय कामांसाठी कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. कारण १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्पचा वापर बंद केला जाणार आहे. यामुळे जी कामे १०० किंवा २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरमध्ये होत होती, ती कामे करण्यासाठी वणी तालुक्यातील नागरिकांना आता ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी होणार आहे; पण या निर्णयामुळे ज्यांनी यापूर्वीच खरेदी केलेल्या १०० व २०० रुपयांचे स्टॅम्पपेपर पुढे चालणार की त्यांना ते रद्द करून पाचशे रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागणार, याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. 

करारासाठीही ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीसाठी यापूर्वी १०० किवा २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज नोंदणीकृत करता येत होते. मात्र, आता ही रक्कम किमान पाचशे रुपये करण्यात आली आहे. कोणताही करार करताना वापरावे लागणारे मुद्रांकही ५०० रुपयांचे असतील.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ