शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

टिपेश्वर अभयारण्यात क्षमतेच्या चौपट वाघांचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देजंगल क्षेत्र कमी पडतेय : अभयारण्याच्या बाहेर वाघांचा वावर ठरतोय गावांसाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख वैभव असलेल्या पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यात ‘क्षेत्र कमी आणि वाघांची संख्या जास्त’ अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ जंगलाबाहेर येत असून ते मानवी व पशु जीवांसाठी धोकादायक बनले आहेत.वन्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. त्याच्या या संचार क्षेत्रात तो अन्य कुणाला एन्ट्री करू देत नाही. त्यामुळे इतर वाघ आपले क्षेत्र इतरत्र शोधतात. त्यामुळे क्षेत्र निश्चित करण्याच्या नादात हे वाघ अभयारण्याबाहेर येऊ लागले आहे. मात्र मानवाला वाघांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा समज होऊ लागला आहे. प्रत्यक्षात वाघाला त्याचे क्षेत्र कमी पडत आहे.टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. तेथे जास्तीत जास्त ७ ते ८ वाघ संचार करू शकतात. मात्र तेथे वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरकार व वन प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येते. वाघांच्या दहशतीमुळे टिपेश्वर बाहेरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतींच्या कामांवरही त्याचा परिणाम होतो आहे.प्रत्येक व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांची स्थिती वेगळी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ८० नर वाघांचे वास्तव आहे. त्याचा बफर झोन आता वाढविल्याने सुमारे १२०० चौरस किलोमीटर झाला आहे.बोर सर्वात छोटे व्याघ्र प्रकल्पराज्यात बोर हे सर्वात छोटे अर्थात १३० चौरस किलोमीटर क्षेत्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचा बफर झोन मात्र आता ५०० चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. उमरेड-कन्हान व्याघ्र प्रकल्पातसुद्धा कमी क्षेत्रात जास्त मादी वाघ असल्याचे सांगितले जाते.व्याघ्र प्रकल्प हवा हजार चौकिमींचाटिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान ८०० ते एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहेत.वाघांच्या स्थलांतरणावर हवा जोरटिपेश्वरचे कोअर क्षेत्र वाढविताना गावांची अडचण येत आहे. कारण की परिसरात अनेक गावे आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची संख्या नियंत्रित करण्यावर, स्थलांतरित करण्यावर जोर दिला जात नसल्याने वाघ अभयारण्याबाहेर गाव आणि शेतशिवारात शिरुन नरभक्षक बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून आत्ताच व्यापक उपाययोजना न झाल्यास पुढेही मानवी जीवांना वाघांचा धोका कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.क्षमता सात वाघांची, प्रत्यक्षात वावरतात ३० वाघतज्ज्ञांच्या मते, टिपेश्वर अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात तेथे वाघांच्या वास्तव्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. वाघांची सतत भटकंती सुरु असते. एखादा वाघ दरवर्षी ट्रॅप कॅमेरात दिसत असेल तर तो तिथे निवासी झाला असे वन विभाग मानतो. वाघांची पिल्ले मात्र सतत ठिकाण बदलवितात.टिपेश्वर व पैनगंगा मिळून व्याघ्र प्रकल्पआता टिपेश्वर आणि पैनगंगा हे दोन अभयारण्या मिळून एक व्याघ्र प्रकल्प करता येतो का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. टिपेश्वर परिसरात बफर झोन वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. बफर झोन वाढविल्यास कोणतेही पुनर्वसन करावे लागत नाही. गावे, शेती कायम राहते. मानव व प्राण्यांचे सहअस्तित्व बफर झोनमध्ये मान्य करण्यात आले.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ