लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक लोकशाही देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाकारली आहे. भारतातील आदिवासीबहुल भागात इव्हीएम साक्षरता नाही. यामुळेच मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. ‘इव्हीएम हटाओ - देश बचाओ’ असा नारा देत मंगळवारी भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा कचेरीवर धडक दिली.राज्यात निरक्षरांचे प्रमाण २५ टक्केच्या आसपास आहे. यात आदिवासीबहुल भागातील संख्या अधिक आहे. मतदान प्रक्रियेत घोटाळा केला जात आहे. त्यामुळे मतदान पद्धतीतून इव्हीएम मशीन बाद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. हीच मागणी घेऊन घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नईम शेख, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, जिल्हा संघटक शैलेश भानवे, लक्ष्मण पाटील, सचिन शंभरकर, महिला आघाडीच्या धम्मावती वासनिक, करुणा मून, ज्योत्स्ना भगत, ज्योती वागदे, वंदना तायडे आदींची उपस्थिती होती.
‘ईव्हीएम’ बंदसाठी भारिप-बमसंची कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:51 IST
अनेक लोकशाही देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाकारली आहे. भारतातील आदिवासीबहुल भागात इव्हीएम साक्षरता नाही. यामुळेच मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. ‘इव्हीएम हटाओ - देश बचाओ’ असा नारा देत मंगळवारी भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा कचेरीवर धडक दिली.
‘ईव्हीएम’ बंदसाठी भारिप-बमसंची कचेरीवर धडक
ठळक मुद्देघंटानाद करणार : आदिवासीबहुल भागात ईव्हीएम साक्षर नाही, मतदानात घोटाळे