शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

जातिवंत विचार सोडा, ओबीसी समजून लढा - श्रावण देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 16:59 IST

ओबीसी आरक्षण नष्ट करणाऱ्या पक्षातील ओबीसी नेते आपल्या पदाचा राजीनामा का देत नाही, असा सवालही या पत्रकार परिषदेत प्रा. देवरे यांनी केला.

ठळक मुद्देघरापासूनच चळवळ सुरू करण्याची गरज

नेर (यवतमाळ) : सर्वच राजकीय पक्षाला सत्तेचा मोह आहे. यामुळे ते ओबीसी आरक्षणाबाबत उदासीन आहे. ओबीसींनी आपल्या घरापासून आरक्षणाची चळवळ शोधून दुसरा राजकीय पर्याय शोधला पाहिजे. मी तेली, मी माळी, मी न्हावी, असे जातिवंत विचार सोडून मी ओबीसी समजून प्रत्येकाने लढा देण्याची गरज आहे, असे विचार ओबीसींचे राष्ट्रीय वक्ते प्रा. श्रावण देवरे यांनी मांडले. येथील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.

प्रा. देवरे म्हणाले, ओबीसींच्या सन १९९० पूर्वीच्या चार पिढ्यांनी मोठ्या कष्टाने आरक्षण मिळविले. स्वामी पेरियार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती चंदापुरी, ललनसिंह यादव, शहीद जगदेव प्रसाद, बाबू कुशवाहा, ॲड. जनार्दन पाटील यासारख्या अनेकांचा ओबीसींच्या आरक्षणासाठी मोठा त्याग आहे. जननायक कर्पुरी ठाकूर, माधवसिंग सोलंकी, व्ही.पी. सिंग यासारख्या नेत्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आज ओबीसी आरक्षण संपविले जात असताना एकही ओबीसी मंत्री राजीनामा देत नाही, ही शरमेची बाब आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी इंपिरिकल डेटा गोळा करणे किंवा केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगनना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हा डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागास आयोगाकडे सोपवले आहे. मात्र, यासाठी ३५० कोटींचा निधी राज्य सरकार देत नाही. भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडून ओबीसींचा डेटा आणत नाही, असे प्रा. देवरे म्हणाले.

- तर एकही पक्ष उमेदवारी देणार नाही

ओबीसी आरक्षण नष्ट करणाऱ्या पक्षातील ओबीसी नेते आपल्या पदाचा राजीनामा का देत नाही, असा सवालही या पत्रकार परिषदेत प्रा. देवरे यांनी केला. सावध व्हा आणि राजकीय पर्याय शोधा. अन्यथा ओबीसी वोटबँक नष्ट होऊन त्या दिवशी मुंडे, भुजबळ, पटोले, वडेट्टीवार, बावनकुळे या ओबीसी नेत्यांना एकही पक्ष नगरसेवकांचे तिकीटही देणार नाही. ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत एकही ओबीसी निवडून येणार नाही. सर्व राजकीय पक्ष ओबीसीचे शत्रू आहेत, हे सिद्ध झाले आहे, असाही आरोप प्रा. श्रावण देवरे यांनी केला. यावेळी शोभा श्रावण देवरे यांच्यासह नरेंद्र गद्रे, गणेश राऊत, उमेश इंगोले, राजेश धोटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणreservationआरक्षण