शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागरिकांनीच पकडले घरफोड्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 05:00 IST

सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन नागरिकांनीच तयार केला. घरावर नजर ठेवून असलेले चोरटे बंद घराच्या आत शिरले. दार तोडून घरात जाणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यातील एकजण हाती लागला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सातत्याने चोरी व घरफोड्या होत आहेत. स्थानिक पाेलीस ठाण्यांमध्ये कुठलीच कारवाई आजपर्यंत करण्यात आली नाही. चोरीच्या घटना होत असतानाही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासण्यात आले नाही. यामुळे चोऱ्या वाढत आहे. शनिवारी रात्री वडगाव परिसरातील श्रीराजनगरमध्ये एका बंद घरावर दिवसभरापासून दोन संशयित पाळत ठेवून होते. ही बाब परिसरातील जागरूक नागरिकांच्या लक्षात आली. ९.३० वाजता चोरटे बंद घराच्या कंपाऊंडमध्ये शिरले. नागरिकांनी शिताफीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. एक आरोपी नागरिकांच्या हाती लागला, तर एकजण पळून गेला. श्रीराजनगरमधील एक कुटुंब दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले आहे. त्या घरावर अनोळखी युवक पाळत ठेवून होते. ही बाब शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन नागरिकांनीच तयार केला. घरावर नजर ठेवून असलेले चोरटे बंद घराच्या आत शिरले. दार तोडून घरात जाणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यातील एकजण हाती लागला. वैभव जिरकर, रा. तलावफैल असे नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने स्वत:चे नाव सांगितले. त्याला आणखी दरडावून विचारल्यावर साथीदार रोशन क्षीरसागर ऊर्फ चिकण्या, रा. बांगरनगर हा सोबत असल्याचेही सांगितले. शहरातील अनेक घरफोड्यांची कबुली त्याने नागरिकांपुढे दिली. नंतर अवधूतवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अवधूतवाडीतील कर्मचारी नितीन सलाम यांनी घटनास्थळ गाठून आरोपी वैभव जिरकर याला ताब्यात घेतले. या चोरट्याकडून अनेक घटना उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी पोलीस किती परिश्रम घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरातीमागून घोडे - शहरात चोरट्यांची दहशत पसरली असताना आता स्थानिक गुन्हे शाखेला जाग आली आहे. रेकॉर्डवरच्या आरोपींची तपासणी व धरपकड केली जात आहे. शनिवारी राबविलेल्या मोहिमेतून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चोरीच्या घटनांचा महत्त्वपूर्ण सुगावा हाती लागतो का, याचा शोध घेतला जात आहे. - मात्र नागरिकांनी चोरट्याला पकडल्यानंतर पोलीस पोहोचले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  

 सराईत गुन्हेगार बाहेर कसे ?- श्रीराजनगरमध्ये नागरिकांनी पकडलेला चोरटा वैभव जिरकर व त्याचा साथीदार रोशन क्षीरसागर ऊर्फ चिकण्या यांच्या विरोधात पाेलीस दप्तरी अनेक गुन्हे आहेत. सातत्याने घरफोड्या होत असतानाही अवधूतवाडी पोलिसांनी या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला एकदाही चौकशीसाठी बोलाविण्याची तसदी घेतली नाही. सराईत चोर गावात फिरत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेऊन गप्प का होते, असा संशय व्यक्त होत आहे. खात्यातीलच काहींची चोरीच्या रॅकेटमध्ये भागीदारी तर नाही ना, असाही संशय उपस्थित केला जात आहे.  

अशी आहे चोरीची पद्धत - चोरटे शहरातील विविध भागात भंगार व इतर व्यवसायाच्या निमित्ताने फिरतात. घरांची रेकी केली जाते. दिवसभर पाळत ठेवून रात्री घरफोडीचा बेत आखला जातो. त्यानंतर कोठून घरात शिरायचे व मुद्देमाल कसा पळवायचा याचे नियोजन केले जाते. पोलिसांच्या प्रमुख मार्गाने फिरणाऱ्या गस्तीच्या वाहनांना पद्धतशीरपणे चकमा देण्यात येतो. या पद्धतीमुळेच पोलिसांना चोर सापडत नाही.

 

टॅग्स :Thiefचोर