शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देमहसूलचे शिक्कामोर्तब : अंतिम पैसेवारी ४७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.संपूर्ण जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. प्रारंभी उत्तम अवस्थेत असलेली कपाशी पावसाने पाठ फिरवल्याने हातातून गेली. याचा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. एक ते दोन क्विंटलच्या कापूस उताऱ्यावरच शेतकºयांना समाधान मानावे लागले. दिवाळीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे फरदडचे उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही.सोयाबीनच्या बाबतीत असेच घडले. अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अपुºया पावसाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या. त्याला उत्तम असा उताराच आला नाही. यामुळे सोयाबीनचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन उत्पादकला याची मोठी किंमत चुकवावी लागली. तुरीच्या पिकावर शेतकºयांची आशा होती. मात्र तुरीचे खराटेच झाले. धुवारी, अवेळी आलेला पाऊस, अळीचे आक्रमण आणि कडाक्याच्या थंडिने तुरीचा बार जळला. शेंगा वेळेपूर्वीच वाळल्या. जिल्ह्यातील अर्ध्या अधिक शेतकºयांनी तुरीची सोंगणीच केली नाही. इतकी वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. एकंदरीत सर्वच पीक हातातून गेल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. आता पुढील सहा महिन्यात कुठलेही पीक हातात नाही. दुसºयांची देणी बाकी आहे. या स्थितीत कुटुंब चालवायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे उभा आहे.तात्काळ उपाययोजना हव्यादुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजनांची गरज आहे. विशेष म्हणजे, शेतीला जोडधंदा असला तरच शेतकरी अशा स्थितीत तग धरणार आहे. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळी छाया पडली. यामुळे शेतकरी पार खचला आहे.आता नऊ नव्हे १६ तालुक्यांंना दुष्काळी सवलतीसुधारीत आणेवारीमध्ये ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. सात तालुक्यांनी महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवित संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. आता अंतिम पैसेवारीमध्ये सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत आले आहेत. यामुळे १६ तालुक्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.