शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाची देयके कारखान्याकडे आहे. हंगामी कामगार व पूर्णवेळ कामगारांचा पगार अडकला आहे.

ठळक मुद्देवसंत कारखाना : चार वर्षांपासून बंद असलेले गाळप सुरू करण्यासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना मागील चार वर्षांपासून बंद पडला आहे. याचे परिणाम शेतकरी व स्थानिक कामगारांना भोगावे लागत आहे. हा कारखाना सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी येथील कामगार व परिसरातील शेतकऱ्यांनी संयुक्त लढा उभारला आहे. कारखाना परिसरातच हे आंदोलन सुरू आहे.बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाची देयके कारखान्याकडे आहे. हंगामी कामगार व पूर्णवेळ कामगारांचा पगार अडकला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्यावर सांकेतिक ताबा घेतला आहे. अकोला फंड कार्यालयाने कारखान्याला सील ठोकले व भाडेतत्वावर कोणी घेतला नाही.संचालक मंडळानी राजीनामे देवून आपली जबाबदारी झटकली आहे. प्रशासकाची नेमणूक केली. परंतु प्रशासक आलेच नाही. त्यामुळे कारखान्याला कोणी वाली नाही. भाजप सरकारने सहकाराला आर्थिक मदत केली नाही. महाविकास आघाडी सरकारने बंद वसंत कारखाना चालू करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी सहकार्य करावे, अशी मागणी ऊस उत्पादक व कामगार करीत आहे.२२ जानेवारीला उमरखेड कृषी उत्पन बाजार समीतीच्या शेडमध्ये सभा झाली.त्यावेळी ऊस उत्पादक सभासद प्रदीप देवसरकर, बळवंतराव चव्हाण, डॉ.गणेश घोडेकर, संतोष जाधव, व्ही.एम. पंतगराव, बालाजी वानखेडे, गजानन कदम, उत्तम जाधव आदींनी भूमिका मांडली. कारखाना सुरू करण्यासाठी पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या चारही तालुक्यातील शेतकरी एकत्र येवून निधी जमा करून बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी ऊस उत्पादक व कामगार संघर्ष करण्याचा निर्णय एकमताने घेतला.

टॅग्स :StrikeसंपSugar factoryसाखर कारखाने