शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नेर ग्रामीणमध्ये विजेचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:25 IST

थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न गंभीर : गर्मीने जीव कासावीस, पंखे-कुलर बंद, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. कुलर-पंखे घराची शोभा वाढविणारे ठरत आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत आहे. कितीही तक्रारी केल्या तरी विद्युत कंपनीचे कर्मचारीच काय, तर अधिकारीही दुर्लक्ष करत आहे. परिणामी नागरिकांचा संताप वाढत आहे.विद्युत कंपनीचा उदासीन कारभार नवीन राहिलेला नाही. यामध्ये सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही. कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामीण भागात विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नाही. चार ते पाच दिवसपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याच्या योजनांना बसतो. पीठ गिरण्याही बंद राहात असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा पोटमारा होतो.उन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने केली नाही. झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या नाही. वारा सुरू होताच या तारांच्या स्पर्शाने वीज पुरवठा गुल होतो. अनेक भागातील डीपी दुरुस्त करण्यात आलेल्या नाही. काही ठिकाणी चालचलाऊ कामे झाली. एकसोय वीज पुरवठा राहावा यासाठी काहीही उपाय केलेले नाहीत. कमी जास्त होणाऱ्या वीज प्रवाहामुळे विद्युत मोटारी जळतात. घरगुती उपकरणांनाही फटका बसतो.शेतातील मोटारपंप जळाल्याने शेती पिकांचे सिंचन होत नाही. यात शेतमालाचे नुकसान होते. दुसरीकडे मोटारपंप दुरुस्तीचा आर्थिक फटका बसतो. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद राहते. आधीच पाणीटंचाई असताना नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची भर उन्हात पायपीट होते. या सर्व परिस्थितीला विद्युत कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.खासगी वायरमनकडून कामाची जोखीमविजेची समस्या निर्माण झाल्यास विद्युत कंपनीचे वायरमन उपलब्ध होत नाही. अशावेळी गरजवंतांना नाईलाजाने खासगी वायरमनकडून कामे करून घ्यावी लागतात. त्यांच्याकडून कामे करून घेताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते. एखाद्यावेळी अपघात झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी विद्युत कंपनीच्या वायरमनकडूनच अशा लोकांचा वापर केला जात आहे. विजेतील बिघाड स्वत: दुरुस्त न करता अकुशल वायरमनकडून कामे करून घेतली जाते. अपघात झाल्यास अशा खासगी व्यक्तीच्या कुटुंबाचे नुकसान होते. शिवाय विद्युत कंपनीवर ठपका बसतो. तरीही वायरमनविरूद्ध कारवाईची हिंमत दाखविली जात नाही.

टॅग्स :electricityवीज