शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण : ३० हजार परप्रांतीयांचीही आरोग्य तपासणी, दहा हजार होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना बाधितांचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत आहे. या मोहिमेत आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र त्यांना कोरोना सारखे लक्षणे नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून आलेले, परराज्यातून आलेले, परदेशातून आलेले अशा विविध बाबींची नोंद घेतली जात आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे याबाबत अहवाल नोंदविला जात आहे.आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे. यामुळे आता पुढील उपाययोजना आणि त्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दिशा मिळणार आहे. या सर्वेक्षणात आठ हजार ७६६ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याचे पुढे आले आहे.ही लक्षणे वातावरण बदलामुळे असल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. यानंतरही या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप या आजारातील औषधांचे वितरण आरोग्य विभाग करणार आहे.कोरोना सदृश्य लक्षणे इतर नागरिकांमध्ये दिसले नाही. मात्र त्यानंतरही दररोज आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना गावपातळीवर पाठविण्यात आल्या आहे. या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कुणाची प्रकृती खालावल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रुग्णांना हलविण्याच्या उपाययोजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्यासंदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ आयसोलेशन वार्डात हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना केल्या जात आहे. पुढील काळात यामध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.१९ हजार नागरिक निघाले परिघाबाहेरपरजिल्ह्यातून ३० हजार ८५७ व्यक्ती दाखल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे या शहरासह परराज्यातूनही आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. यामधील १९ हजार ९३८ व्यक्ती १४ दिवस होम क्वारंटाईन होत्या. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना परिघाबाहेर काढण्यात आले आहे. दहा हजार ९१९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. या व्यक्तींना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या व्यक्तींची १४ ही दिवस आरोग्य विभाग तपासणी करणार आहे. त्यांच्यात कुठले लक्षणे आढळली तर तत्काळ तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्या जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या