कोरोनाचे आणखी आठ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:18+5:30

मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पांढरकवडा ४५, पुसद २७, आर्णी दहा, दारव्हा १, दिग्रस ७, महागाव १२, मारेगाव २, नेर ३, उमरखेड २ तर वणी तालुक्यात १० कोरोना रुग्ण मंगळवारी वाढले.

Eight more victims of Corona | कोरोनाचे आणखी आठ बळी

कोरोनाचे आणखी आठ बळी

Next
ठळक मुद्दे१९४ रुग्ण वाढले : दोन महिन्यात २६७ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच मृत्यूचा कहर बरसविणाऱ्या कोरोनाने सप्टेंबर संपता-संपताही बळी घेतलेच. मंगळवारी आणखी आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या महामारीत आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या तब्बल २६७ पर्यंत वाढली आहे.
दगावलेल्या आठ जणांमध्ये यवतमाळातील दोघांसह वणी, पुसद, महागाव, राळेगाव आणि बाभूळगावमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. इतर सात जण पन्नाशी-साठीच्या पुढच्या वयाचे असले तरी महागाव तालुक्यातील अवघ्या ३० वर्षाच्या तरुणाचाही मृतकांमध्ये समावेश आहे.
मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पांढरकवडा ४५, पुसद २७, आर्णी दहा, दारव्हा १, दिग्रस ७, महागाव १२, मारेगाव २, नेर ३, उमरखेड २ तर वणी तालुक्यात १० कोरोना रुग्ण मंगळवारी वाढले.
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत तब्बल आठ हजार ४७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २७५ रुग्ण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत ७४ हजार ७१३ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६५ हजार २२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १०२३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

रुग्णसंख्येवरून प्रशासनात बेबनाव
दररोज किती रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, किती अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, याबाबतची संख्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला व तेथून जिल्हा प्रशासनाला मिळाल्यावर ही संख्या प्रसिद्धी माध्यमांना कळविली जाते. मात्र मंगळवारी डिस्चार्ज आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलीच नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले. यावरून रुग्णसंख्या आणि त्यांच्या नोंदीबाबत प्रशासनातच बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Eight more victims of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.