शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ईगल कंपनी महसूल प्रशासनालाही जुमानत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:00 AM

आतापर्यंत विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून चोरट्या मर्गाने विल्हेवाट लावणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र ठरल्याने ईगल कंपनीविरुध्द १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु रकमेची वसुली मात्र झाली नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील गौण खनिज अवैद्य उत्खनन : १ कोटी ४० लाखाचा दंड, परंतु छदामही भरला नाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करुन वाहतूक केल्याप्रकरणी रस्ता बांधकाम कंपनी ईगल इनस्फ्रास्ट्रक्चरला तीन प्रकरणात १ कोटी ३९ लाख ७० हजाराचा दंड ठोठावण्यात आला. परंतु आतापर्यंत कंपनीने कोणत्याही दंडाची रक्कम भरलीच नाही.यातील दोन प्रकरणाला वर्ष लोटले तरी आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. कंपनी महसुलचे आदेश पायदळी तुडवत आहे. मोठा महसुल मिळू शकणाऱ्या या प्रकरणात विभागाकडून पुढील कारवाईसाठी ठोस असे काही केल्याचे दिसत नाही. ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून दारव्हा-यवतमाळ, दारव्हा-नेर आणि दारव्हा-कुपटा राज्यमार्गाचे रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरणाचे काम केल ेजात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. मांगकिन्ही येथील गट नंबर ९८/१ मधील शेतातून विनापरवानगी पोकलँड मशीनने अवैध उत्खनन केल्या प्रकरणी २६ जुलै २०१९ ला कंपनीला ११ लाख ७० हजाराचा रुपयांचा दंड केला. बागवाडी येथील गट क्रमांक २७/४ मधील एक हेक्टर क्षेत्रातून परवानगीपेक्षा जास्त दगडाचे उत्खनन केले. यात पंचनामा व अहवालानुसार अतिरिक्त २ हजार ३०० ब्रास दगडाच्या उत्खननासाठी ३१ डीसेंबर २०१९ ला तब्बल ८९ लाख रुपयांचा दंड झाला.त्यानंतर कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून एक हजार ब्रास गौण खनिज उत्खननासाठी एसडीओंची परवानगी घेतली. परंतु त्यापेक्षा जास्त उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला. त्यानुसार एक हजार ब्रास जास्तीचे उत्खनन केल्याने तहसीलदारांनी १४ आँगष्टला ३९ लाख रुपयांचा दंड ठोठावला. अशाप्रकारे आतापर्यंत विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून चोरट्या मर्गाने विल्हेवाट लावणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र ठरल्याने ईगल कंपनीविरुध्द १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु रकमेची वसुली मात्र झाली नाही.साडेसतरा लाखाच्या नोटीसचे गौडबंगालदोन प्रकरणात कंपनीला १७ लाख ५५ हजाराच्या दंडाची नोटीस बजावली होती. बोथ येथील गट क्रमांक २०/१ व गोरेगाव येथील गट क्रमांक ३७/१ या शेत जमिनीतून मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली असतांना सदर गट क्रमांकामधून उत्खनन न करता मौजा वागद (बु.) येथील गट क्रमांक १३० मधील ३ हेक्टर शेत जमिनीतून अंदाजे दोनशे ब्रास मुरूम विनापरवानगी उत्खनन केला. या प्रकरणात ७ लाख ८० हजाराच्या दंडाची नोटीस दिली. तसेच मौजा कुंभारकिन्ही येथील गट क्रमांक ९३ मधून अंदाजे २५० ब्रास मुरूम वापरण्यात आल्याच्या प्रकरणात ९ लाख ७५ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस दिली होती. या नोटीसचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे.ईगल कंपनीला अवैद्य गौण खनिज उत्खनन प्रकरणात दंड करण्यात आला. दंडाची रक्कम भरुन घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.- संजय जाधव, तहसीलदार, दारव्हा 

टॅग्स :highwayमहामार्ग