कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:38 AM2017-08-23T00:38:42+5:302017-08-23T00:39:47+5:30

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि.....

 The duty of duty efficient police | कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

कर्तव्यकुशल पोलिसांचा कार्यगौरव

Next
ठळक मुद्देमनसेचा उपक्रम : सपना पळसकर प्रकरणाचा यशस्वी तपास, सात जणांना फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या चोरंबा (ता.घाटंजी) येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणाचा तपास अतिशय कुशलतेने करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गौरव करण्यात आला. या प्रकरणातील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
येथील अप्सरा टॉकीज चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार होते. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बायस, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सरकारी वकील शुभांगी वीरेंद्र दरणे, प्रेमदास आडे, राजू झाडे, रावसाहेब शेंडे, विजय पवार, किरण श्रीरामे, सैयद साजिद, अखिल देशमुख, अरुण नाकतोडे, गजानन अजमिरे, आशीष भुसारी, सचिन मुंडे यांचा शाल, श्रीफळ व गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वर्षभरापासून बेपत्ता सपनाचा शोध लागत नव्हता. विविध संघटना आणि राजकीय पक्ष आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. विधानसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशा या प्रकरणाचा छडा पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बायस व चमूने लावला. या प्रकरणातील तपास अधिकारी, कर्मचाºयांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, बाळासाहेब चौधरी आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला देवानंद पवार, मिलिंद धुर्वे, राजेंद्र हेंडवे, अमनभाई, अ‍ॅड. मनोज जोग, अ‍ॅड. वीरेंद्र दरणे, मनसेचे संजय देठे, अमित बदनोरे, फारूक तमन्ना, संगीता घोडमारे, अभिजित नानवटकर, छबूताई आठवले, पिंटू पिंपळकर, संदीप भिसे, बंडू बोपचे, नंदू कनोजिया, पराग बारले, अजय गोडबोले आदी उपस्थित होते.
 

Web Title:  The duty of duty efficient police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.