शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जिल्ह्यावर टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 21:53 IST

जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्प कोरडेच : आता भिस्त परतीच्या पावसावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ५५.४१ टक्के पावसाची नोंद झाली. दरवर्षी याच कालावधीत किमान ७० टक्केच्यावर पाऊस बरसतो. त्या तुलनेत हा पाऊस १५ टक्यांनी कमी आहे. त्यातही यंदा बरसलेल्या पावसात मोठा खंड पडला. तुरळक आणि पिकायोग्य सरींनी पिकांना जीवदान मिळाले खरे, मात्र नदी, नाले अद्याप कोरडेच आहेत. शेतात पिके डौलाने उभी आहेत. मात्र जमिनीत पाणी मुरले नसल्याने जिल्ह्याची पाणी पातळी ०.६५ टक्क्यांनी खोल गेली होती. ही पातळी अपुºया पावसाने आणखी खोल जाण्याचा धोका वाढला आहे.यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोना जलाशयात आता केवळ २ फूट पाणी शिल्लक आहे. चापडोह प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही प्रकल्पातील पाण्यावर यवतमाळकरांची तहान अवलंबून आहे. मात्र हे पाणी केवळ दोन महिने अर्थात नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पुरेल एवढेच आहे. नंतर पाण्यासाठी चापडोह प्रकल्पावर इमर्जन्सी पंप बसवावे लागणार आहे. आजपर्यंत या प्रकल्पावर कधीच इमर्जन्सी पंप बसविले गेला नाही, हे विशेष.दारव्हा शहराला पाणीपुरवठा करणाºया कुंभारकिन्ही प्रकल्पातही २७ टक्केच पाणी आहे. वणीला पाणीपुरवठा करणाºया नवरगाव प्रकल्पातही अपुरा जलसाठा आहे. पुसद शहराला पाणी पुरवठा करणाºया पूस प्रकल्पात २२.३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या शहरांसह जिल्हा मुख्यालयाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील पेयजलाचे चित्र यापेक्षाही बिकट होणार आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यापूर्वीच जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता बळावली आहे. ही परिस्थिती पालटण्याची ताकद केवळ परतीच्या पावसातच आहे. हा पाऊस बरसल्यास पेयजलाचा गंभीर प्रश्न थोडा तरी सुटण्यास मदत होणार आहे.यवतमाळ, राळेगाव, कळंबला फटकाजिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव आणि कळंब तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. यवतमाळ तालुक्यात ३२.८२ टक्के, कळंब ३१ टक्के तर राळेगावमध्ये ३१ टक्के पावसाची नोंद झाली. या तालुक्यात आत्ताच पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी किती पायपीट करावी लागेल.३० सप्टेंबरनंतर चित्र स्पष्टभूजल सर्व्हेक्षण विभागाने गेल्या मे महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची तपासणी केली. पावसाळा संपल्यानंतर १५ सप्टेंबरपासून पुन्हा भूजलाची नोंद घेतली जाते. त्यामुळे ३० सप्टेंबरनंतरच जिल्ह्यातील भूजल पातळीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच शासन आणि प्रशासन ठोस उपाययोजना करण्याची शक्यता आहे.पुसदने सरासरी गाठलीपुसद तालुक्यात १००.१४ टक्के पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र त्यानंतरही तालुक्यातील पूस प्रकल्पामध्ये केवळ २२.३० टक्के जलसाठ्याची नोंद झाल्याने पावसाच्या टक्केवारीकडे साशंकतेने पाहिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी होणारी पावसाची टक्केवारी तालुक्यातील शेतकºयांना फसवी वाटते आहे.