शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

अंबरदिवा नसल्यानेच पेटविले राळेगाव ‘एसडीओं’चे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:56 IST

वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाºयांनी शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देजिल्हा दंडाधिकाऱ्यांचा अहवाल : सखी-कृष्णापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघ पकडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गावकºयांनी उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटवून दिले होते. या घटनेमागे वाहनावर अंबरदिवा नसणे हे प्रमुख कारण पुढे आले, असा अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे.मंत्री, सनदी अधिकारी व राज्य सेवेतील दंडाधिकाºयांच्या वाहनांवरील दिवे काढले गेले आहे. त्यामुळे सर्वत्र ओरड पहायला मिळते. सध्या केवळ पोलिसांच्या वाहनावर अंबरदिवे आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे कारण सांगून पोलिसांना अंबरदिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंत्री, जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दिवा नाही, मात्र ठाणेदारांच्या वाहनावर अंबरदिवा असे विसंगत चित्र सर्वत्र पहायला मिळते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तालुका, उपविभागीय आणि वेळप्रसंगी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही संतप्त जमावापुढे जावे लागते. त्यामुळे दंडाधिकाºयांनाही अंबरदिवा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी ‘सीएमओ’ व सचिवालयात सनदी अधिकाºयांकडून केली गेली आहे. अंबरदिवा नसल्याने काय घटना घडू शकतात याचा हवालाही देण्यात आला आहे. त्यात राळेगाव तालुक्याच्या सखी (कृष्णापूर) गावात १६ सप्टेंबर २०१७ रोजी घडलेल्या घटनेचाही समावेश आहे.या घटनेबाबत यवतमाळच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शासनाला गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्यात राळेगावचे एसडीओ संदीपकुमार अपार यांच्या शासकीय वाहनावर अंबरदिवा नसल्यानेच त्यांचे वाहन पेटविले गेल्याचे अहवालात म्हटले आहे. कृष्णापूर भागात वाघाचे हल्ले वाढले होते. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग वाघाला पकडण्यासाठी कोणत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत नसल्याने गावकºयांचा वन खात्याच्या अधिकाºयांवर रोष होता. घटनेच्यावेळी गावात आलेले वाहन वन विभागाचेच आहे, असे समजून गावकऱ्यांनी हे वाहन पेटवून दिले. या वाहनावर अंबरदिवा असता तर हे वाहन एसडीओ-तहसीलदारांचे आहे, अशी ओळख पटली असती. पर्यायाने जमाव ंआक्रमक झाला नसता व वाहन पेटविण्याची ही घटना टळली असती, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.दिव्याअभावी कृष्णापूर घटनेच्या पुनरावृत्तीची भीतीवाहनावर अंबरदिवा नसल्याने कृष्णापूरच्या घटनेची कुठेही पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी दंडाधिकारीय अधिकारी संतप्त जमावाच्या गर्दीत जाणे टाळतात, बहुतांश विलंबाने जाण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. जमाव अनेकदा पोलिसांची वाहने पेटवितो, मात्र दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना सहसा हात लावत नाही, असा अनुभव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दंडाधिकाऱ्यांच्या वाहनांना अंबरदिवा लावण्याची परवानगी देऊन त्यांची ओळख पुन्हा बहाल करावी, असा महसूल अधिकाºयांमधील सूर आहे.