लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील बोरी (मच्छींद्र) येथील नाल्यात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.राम गिरीधर काळे (१०) रा. बोरी असे मृत बालकाचे नाव आहे. राम हा लगतच्या लक्ष्मीनगर (बोरगडी) येथील राष्टÑसंत तुकडोजी महाराज विद्यालयात तिसरीत शिकत होता. मित्रांसह पोहायला गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या मागे आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
नाल्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:48 IST