शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेचे १९ बळी - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:00 IST

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. 

यवतमाळ - अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन १९ लोकांचा बळ गेला तर जवळपास सातशे शेतकरी-शेतमजूर बाधित झाले आहे, या पार्श्वभूमिवर बुधवारी खासदार नाना पटोले हे यवतमाळला येऊन गेले. येथील शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूरांची सध्याची स्थिती ही शासन व प्रशासनासाठी भूषणावह नसल्याचे ते म्हणाले. यवतमाळ जिल्हयात शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी विषेश पॅकेजही शासन देत आहे. तरीसुद्धा शेतकºयांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नसल्याचे ते म्हणाले. शासनाने फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकºयांना केवळ दोन लाख रुपये जाहीर केले आहे. त्याने शेतकरी-शेतमजूरांचे प्राण वापस येईल का, असे सांगून विषबाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ६० ते ७० हजार रुपये स्वत: उपचारासाठी खर्च करावे लागत असल्याचे ते म्हणाले. देशातील अशाप्रकारची ही मोठी गंभीर घटना यवतमाळ जिल्हयात घडली असताना त्याचे कुणालाही कोणते सोयर-सुतक  नसून शासनाने शेतकरी-शेतमजूरांना मरणासाठी सोडल्याचा आरोप त्यांनी केला.  सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कृषी व महसूल विभागातील ६० टक्के पदे रिक्त असल्याचे सांगून योग्य व वेळेवर शेतकºयांना मार्गदर्शन मिळाले असते तर हा प्रकार टाळता येऊ शकला असता. परंतु कृषी विभागातील कृषी सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. बीटी कॉटन आल्यानंतरच्या परिणामाबद्दल विचारच केल्या गेला नाही. बियाण्यांचा अभ्यास नाही, त्याचे परिणाम शेतकºयांना भोगावे लागतात. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बीटीची चौकशी व्हावी आणि या कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच या प्रकरणाच्या सखाले चौकशीसाठी विद्यमान न्यायधीशांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण करण्याची मागणीसुद्धा आपण करणार असल्याचे नानाभाऊ पटोले म्हणाले. यासाठी आपण उद्याच दिल्ली येथे जात असून पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे नानाभाऊ म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे देवानंद पवार, मिलिंद धुर्वे आदी उपस्थित होते.

दोन लाखांत शासन नवरा परत मिळेल का?फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या बंडू सोनुले या शेतमजूराची पत्नी गीता बंडू सानुले पत्रपरिषदेला उपस्थित होती. शासनाने दोन लाख रुपये जाहीर केल्याचे तीला सांगितले असता, मी भीक मागून का होईना शासनाला माझ्याकडून दोन लाख रुपये देईल, त्या बदल्यास शासन माझ्या पतीचे प्राण मला परत आणून देऊ शकेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेFarmerशेतकरी