शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

साडीच्या पदराने सांडली दारू, बायकोला बेल्टने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:21 IST

दारूचा पेला भरून तो तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून रिकामा झाला. यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली.

ठळक मुद्देकेळापूर तालुक्यातील घटना पतीविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ : घरात दारूचा फक्कड बेत रचला आणि दारू घेण्यासाठी त्याने पेलाही भरला. मात्र, तेवढ्यात बायकोच्या साडीचा धक्का ग्लासला लागून दारू सांडल्याने संतप्त झालेल्या तळीरामाने बायकोला बेल्टने मारहाण केली. याप्रकरणी नवरोबाविरोधात पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केळापूर तालुक्यातील घोडदरा येथील प्रमोद श्यामराव वाघाडे (३२) हा सायंकाळच्या सुमारास दारू पिण्यासाठी घरामध्येच बसला होता. दारूचा पेला भरून त तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडल्याने दारूचा पेला रिकामा झाला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रमोदने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. यात ती जबर जखमी झाली. तिने पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार