शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दुष्काळी ससाणी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:54 IST

गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,....

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण राबला. या श्रमाला फळ आले असून पहिल्या पावसानेच कधी नव्हेइतकी जलपातळीत वाढ झाली आहे. विहिरी तुडूंब भरल्या आहेत.नाला खोलीकरण, एलबीएस, सीसीटी, डीप सीसीटी, गॅबियन, शोषखड्डे, शेततळी, साखळी शेततळे, बांधबंधिस्ती करून पाणी मुरविण्यात आले. निसर्गाच्या कृपेने पाणी साठविण्यासाठी केलेले सर्व उपचार फळाला आले आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर श्रमसाफल्याचा पाणीदार आनंद ओसंडून वाहत आहे. गावाने जर मनात ठरविले की आपली समस्या आपणच सोडवायची तर राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला ग्रामविकास व्हायला वेळ लागणार नाही. श्रमदानाच्या या महाकुंभात जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल, कृषीविभाग, सहकारी संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन समिती, समाजसेवी संस्था, पत्रकार बांधव , सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक संघटना, व्यापारी-अडते संघटना, मेडिकल असोसिएशन, जलमित्र, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी संघटना, महिला संघटना आदींनी श्रमदान केले.अडीच लाखांचे कर्ज घेऊन कामससाणीवासियांनी आपल्या गावाची दुष्काळी समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी गाठीला पैसे नसतांना अडीच लाख रुपये कर्ज काढून साखळी शेततळ्याची निर्मिती केली. स्पर्धेत नंबर येवो अथवा न येवो परंतु येणाऱ्या उन्हाळ्यात आमचे ससाणी गांव हे टँकरमुक्त झाले पाहिजे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असेल, असा दृढनिश्चिय ग्रामस्थांनी केला होता.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई