शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धावंडा नदीच्या काठावरच टाकली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:56 IST

धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसला धोक्याची घंटा, नदीचे खोलीकरण-रुंदीकरणामुळे संकटाची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत पूर संरक्षण भिंतीकरिता ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून धावंडा नदीचे एक हजार ५६० मीटर आणि मोरणा नदीचे २६० मीटर रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मंजूर केले आहे.अरुणावती पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर बाब येते. या कामाची निविदा काढण्यात आली. अकलूज येथील राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर झाली. त्यानंतर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. जूनपूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात निघालेली माती काठावर टाकून दबाई करण्याचा प्रस्ताव होता. मात्र नदीच्या वळणदार मार्गामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे काठावर टाकलेल्या मातीमुळे धोका अधिक वाढला. पुरामुळे ही माती वाहत जावून एक तर जवळपासच्या निवासी परिसरात पसरेल किंवा हीच माती वाहून धरणात जमा होण्याची शक्यता आहे.तक्रारीनंतर माती उचलणारमाती काठावरच टाकली जात असल्याची बाब काही नागरिकांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना.राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून माती त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. अरुणावती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अलाटकर यांना विचारले असता त्यांनी कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच माती उचलली जाईल, असे सांगितले. आता लवकरच राज्यमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली.शहराच्या मध्यवस्तीतून वाहते नदीशहराच्या अगदी मध्यातून धावंडा नदी वाहते. नदीच्या पश्चिम भागाला नांदगव्हाण धरण आहे. मात्र सध्या हे धरण उध्वस्त झाले आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी जोरदार प्रवाहाने नदीतून प्रवाहित होते. आता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू आहे. मात्र माती काठवरच टाकली जात असल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे.

टॅग्स :riverनदी