शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

राज्याच्या कला संचालकपदी यवतमाळचे डॉ. किशोर इंगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:12 IST

तरुण वयात घातली यशाला गवसणी : ग्राफिटी चित्रकलेत विशेष हातखंडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १९ वर्षांनंतर राज्य कला संचालनालयाला नवीन कलासंचालक मिळाले आहेत. कलाक्षेत्रात ग्राफिटी कलाकृतीचा अटकेपार झेंडा रोवणारे डॉ. किशोर इंगळे यांच्या गळ्यात कला संचालनालयाच्या कला संचालकपदाची माळ पडली आहे. त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी यशाला गवसणी घातली.

डॉ. किशोर इंगळे यांचे मूळगाव दारव्हा तालुक्यातील गणेशपूर आहे. त्यांनी गावातच प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले. बोरीअरब येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत व टागोर विद्यामंदिरात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. बालपणापासूनच त्यांना कलेची आवड होती. दिग्रस येथून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर, नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला व प्रा. मनीषा पाटील व प्रा. प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनात बी.एफ.ए., एम.एफ.ए. आणि पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. याच महाविद्यालयात ते अध्यापक म्हणून २०११ पासून कर्तव्य बजावत आहेत.

ग्राफिटी चित्रकलेत डॉ. किशोर इंगळे यांचा विशेष हातखंडा असून, देश-विदेशातील कला प्रदर्शनाने अनेकांना भुरळ घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केल्यानुसार कलासंचालक या पदावर डॉ. इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.

१९ वर्षानंतर कलासंचालक मिळालेएक-दोन नव्हे तर तब्बल १९ वर्षांपासून कला संचालनालयाला कलासंचालक नव्हते. एम. बी. इंगळे यांच्यानंतर कलासंचालक म्हणून इंगळेच मिळाले आहेत. सिनेट सदस्य असल्याने डॉ. किशोर इंगळे यांना विद्यापीठ कामाचा अनुभव आहे. राज्याला कलासंचालक मिळाल्याने कला शिक्षणाला अधिक चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ