The doctor's 'labor' affected the patient services | डॉक्टरांच्या ‘कामबंद’ने रुग्णसेवा प्रभावीत
डॉक्टरांच्या ‘कामबंद’ने रुग्णसेवा प्रभावीत

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला निवेदन : कोलकात्यातील मारहाणीचा निषेध, विद्यार्थ्यांनी काढली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात येथील मार्ड संघटना आणि आंतरवासिता डॉक्टरांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज प्रभावीत झाले होते.
११ जून रोजी कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात शुक्रवारी यवतमाळातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात मार्ड संघटनेच्या डॉक्टरांसोबत आंतरवासिता डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी डॉक्टरांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदविला. महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान कांबळे, सचिव डॉ. केतक आंबुलकर, डॉ. योगेश सिंगरवाड, डॉ. जयजित लोखंडे, डॉ. खुशबू चांडक, डॉ. सुमित मसुरे, डॉ. अरविंद कुडमेथे आदी उपस्थित होते.
 


Web Title: The doctor's 'labor' affected the patient services
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.