शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

डाॅक्टरचा मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:00 AM

मंगळवारी डाॅ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातच मास्कधारी युवकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ढाणकी येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मारेकरी शेख ऐफाज अद्याप मोकाट आहे. खुद्द पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे हे तपासावर नजर ठेवून असले तरी आरोपी मोकाट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांची मंगळवारी भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असली तरी मुख्य मारेकरी सहा दिवस लोटूनही पोलिसांच्या टप्प्यात आलेला नाही. अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी डाॅ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातच मास्कधारी युवकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ढाणकी येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मारेकरी शेख ऐफाज अद्याप मोकाट आहे. खुद्द पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदीप पाडवी, ठाणेदार अमोल माळवे हे तपासावर नजर ठेवून असले तरी आरोपी मोकाट आहे. दहा तपास पथकांच्या मेहनतीला अद्याप तरी यश आलेले नाही. 

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण  - डाॅ. धर्मकारे यांचा भरदिवसा खून झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयातील इतर डाॅक्टरांसह सर्वच आरोग्य कर्मचारी दहशतीच्या वातावरणात आहे. आपल्या संरक्षणाची कोणतीही सोय नसल्याची व्यथा त्यांनी एसपींकडे व्यक्त केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी