शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:46 IST

डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देमहसूल राज्यमंत्री राठोड : दारव्हा येथे वैद्यकीय उपकरण पेढीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.येथे डॉक्टर असोसिएशनतर्फे वैद्यकीय उपकरण पेढी उघडण्यात आली. या पेढीच्या उदाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले, अनेक रूग्णांना उपचारादरम्यान विविध उपकरणांची गरज भासते. ही उपकरणे अत्यंत महागडी असल्याने रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागतो. यात बचत व्हावी, याकरिता डॉक्टर असोसिएशनने लोकसहभागातून वैद्यकीय उपकरण पेढी सुरू केली. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मदन पोटफोडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. उपकरणांची गरज भासल्यास रुग्णांनी डॉ.गोपाल अग्रवाल, डॉ.विनोद कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपकरण पेढीला सहकार्य करणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन डॉ.अश्विनी भेंडे, तर आभार डॉ.नितीन भेंडे यांनी मानले.कार्यक्रमाला डॉक्टर व शहरातील नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.मनोज राठोड, डॉ.अमर चावके, डॉ.आशिष पोटफोडे, डॉ.सुनील देवघरे, डॉ.सुनील कराळे, डॉ.भास्कर कुटे, डॉ.नीलेश गायकवाड, डॉ.किरण चव्हाण, डॉ.वसीउल्लाह, डॉ.रिजवान शेख तसेच केमिस्ट असोसिएशनने परिश्रम घेतले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड