शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दारूचा त्रास आम्हाला कळतो मुख्यमंत्र्यांना कळत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:10 IST

जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देचिमुकल्यांचा सवाल : दारूबंदी महामोर्चात सहभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत केला.जिल्ह्यात स्वामिनी दारुबंदी संघटनेच्यावतीने १८ जानेवारी रोजी महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दारूपीडित चिमुकल्यांनी यावेळी केले.प्रत्येक बालकाने दारूड्या पित्यामुळे वाट्याला आलेले दु:ख आपल्या शब्दात व्यक्त केले. इतकेच नव्हे तर दारूचे घातक परिणामही सांगितले. बालमनावर व्यसनाधिनतेमुळे कोणते परिणाम होतात, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.पत्रकार परिषदेत पूनम बोंद्रे हिने आपली वेदना मांडली. तिचे वडील दारूच्या नशेत मरण पावले. आता कुटुंब उघड्यावर आले आहे. इतर मुलांचे वडील दिसताच पूनमला आपल्या वडिलांची आठवण येते, असे तिने साश्रूनयनाने सांगितले. वेदांत गावंडे या मुलाची कहानी वेगळीच आहे. पेंटर काम करणारे त्याचे वडील वेदांतलाच दारूगुत्त्यावर पाठवित होते. दारूच्या नशेत वेदांतच्या वडिलांनी आजोबाला बेदम मारहाण केली. दोन वर्षापूर्वी आजोबा घर सोडून निघून गेले. आता वडिलांचाही मृत्यू झाला. चिमुकला वेदांत पोट भरण्यासाठी आईला मदत करतो.या केवळ प्रातिनिधिक कहाण्या असून आपल्या जिल्ह्यातील शेकडो मुलांचे बालपण दारूने उध्दवस्त केले आहे. वडिलांच्या व्यसनामुळे या चिमुकलांच्या शैक्षणिक हक्कच नव्हे तर आनंदी जीवन जगण्याचा मूलभूत हक्कच हिरावल्या गेल्याचे यश चव्हाण या चिमुकल्याने पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी पलाश सचिन चंदनकर, अक्षरा राजेश मुरकुटे हे चिमुकले उपस्थित होते. तसेच दारूबंदी चळवळीचे संयोजक महेश पवार, प्रा. प्रवीण देशमुख, अभिलाष नीत, पवन धोत्रे, मयुरी कदम, किशोर चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीChief Ministerमुख्यमंत्री