शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

छोरा काढवे गेरणी धुंड करिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:08 IST

तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले.

ठळक मुद्देरंगपंचमी : दिग्रस तालुक्यातील बंजारा समाजाने जपली सांस्कृतिक परंपरा

प्रकाश सातघरे ।ऑनलाईन लोकमतदिग्रस : तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले.दिग्रस तालुक्यात सर्वाधिक बंजारा बांधवांचे वास्तव्य आहे. तालुक्यात बंजारा तांड्यांमध्ये रानमाळावर मोठ्या प्रमाणात बंजारा समाजबांधव राहतात. या तांड्यांवर होळी आणि रंगपंचमीला डफडीचा आवाज घुमतो. विविध गीते गात पारंपरिक पद्धतीने होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र आता या सणांना आधुनिकतेची जोड दिली जात आहे. विविध गीतांच्या तालावर थिरकत नायकाच्या हातातील डफडीच्या तालावर बंजारा बांधव पारंपरिक पेहरावात नृत्य करतात. लेंगी गीते ही बंजारा लोकसाहित्याची खास मेजवाणी असते. या गीतातून निसर्गाचे वर्णन केले जाते. तसेच ईश्वराप्रती भावना व्यक्त केल्या जातात.या लेंगी गीतांमध्ये बरेचदा खोडकरपणाही डोकावतो. फाग आणि लेंगी म्हणजे वर्षभर न विसरणारा क्षण असतो. ‘फागन को महिना गिरीधारी, असे फागनेम गेरणी फळछ’ असे लेंगी गीतांचे स्वरूप असते. ‘मत मार रे मोहन रंग पिचकारी, जमने हातेम चंदन केरो लोटा’ असे म्हणत समाजबांधव पिचकारीतून रंगांचा वर्षाव करतात. गोरबंजारा समाजाचे लोक वाङ्मय लेंगीच्या रूपात दिसून येते. ‘छोरा काढये गेरणी धुंड करिया, टाळ टाळ गेरिया तोपर छोडीया’ असे म्हणत खोडकर लेंगी सादर केली जाते.होळी आई रे होळी डगर चालीबंजारा समाजाची होळी आणि रंगपंचमी लेंगी गीतांच्या श्रृंगाराने नटून जाते. ‘होळी आई रे होळी डगर चाली, उतो गेरियान बेटा आशीद दे चाली’ यातून सर्वांच्या वंशाला दिवा मिळो, अशी मागणी केली जाते. गोरगरिबांना पूत्र रत्न देवून आशीर्वादात देण्याची मागणी केली जाते. ही लेंगी गीते आशय समृद्ध असतात. तालुक्यातील वसंतनगर, वरंदळी, आरंभी, साखरा, सेवानगर, झिरपूरवाडी, मोख येथील समाजातील महिला व पुरुष आधुनिक युगातही पारंपरिक गीते जोपासून आहेत. प्रत्येक ज्येष्ठाच्या तोंडी ही गीते चफकलपणे दिसून येतात.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८